पोटनिवडणूकीनंतर होणार मंत्रिमंडळाचा विस्तार - रावसाहेब दानवे

पोटनिवडणूकीनंतर होणार मंत्रिमंडळाचा विस्तार - रावसाहेब दानवे

पोटनिवडणूक झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज सांगितलं.

  • Share this:

मुंबई,ता.08 मे: पोटनिवडणूक झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज सांगितलं. न्यूज18 लोकमतचे समुह संपादक डॉ.उदय निरगुडकर यांना बेधडक मध्ये दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

गेल्या वर्षभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार यावर चर्चा सुरू आहे. मात्र त्याचा मुहूर्त अद्याप निघालेला नाही. भाजपच्या कोट्यातल्या 4 जागा अजुन रिकाम्या आहेत. मंत्रिमंडळातल्या काही जागा रिकाम्या ठेवून कायम असंतुष्टांना कायम त्याचं गाजर दाखविण्याचं काम सर्वच मुख्यमंत्री करत असतात.

काँग्रेसच्या काळातही असंच केलं जात असे. त्यामुळं ही नुसतीच घोषणा आहे की खरच मंत्रिमंडळ विस्तार होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2018 08:06 PM IST

ताज्या बातम्या