राजकारणात पुन्हा खळबळ, शिवसेनेला भाजपची आणखी एक ऑफर

राजकारणात पुन्हा खळबळ, शिवसेनेला भाजपची आणखी एक ऑफर

भारतात घुसलेल्या घुसखोरांना वाचवा ही काँग्रेसची भूमिका आहे पण शिवसेनेनं देशहिताचा निर्णय घ्यावा त्यासाठी आम्ही तडजोड करण्यासाठी तयार असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

नाशिक, 14 डिसेंबर : देवेंद्र फडणवीसांकडून शिवसेनेला ऑफर दिल्यानंतर आज पुन्हा एकदा भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला एकत्र येण्यासाठी ऑफर देण्यात आली आहे. देशहितासाठी आम्ही शिवसेनेसोबत राजकीय तडजोड करण्यासाठी तयार असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. भारतात घुसलेल्या घुसखोरांना वाचवा ही काँग्रेसची भूमिका आहे पण शिवसेनेनं देशहिताचा निर्णय घ्यावा त्यासाठी आम्ही तडजोड करण्यासाठी तयार असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

शिवसेनेनं आपला मूळ बाणा दाखवला पाहिजे. कोणाला घाबरू नये. राज्यातील सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेनं तडजोड करू नये तर देशहितासाठी भाजप शिवसेनेसोबत राजकीय तडजोड करायला तयार असल्याचं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं. खंरतर सत्ता गेल्यापासून भाजपमध्ये नाराजी आहे. त्यामुळे आता पक्षाला पुन्हा वरती आणण्यासाठी हे प्रयत्न सुरू असल्याच्या राजकीय चर्चा आहेत.

दरम्यान, पुलाखालून आता खूप पाणी वाहून गेलं आहे. त्यामुळे भाजपच्या या ऑफरला काहीही अर्थ नाही अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी दिली. महाविकासआघाडीमध्ये सगळं सुरळीत चालू आहे. पण यात आग लावण्याचं काम भाजप करत असल्याची टीकाही त्यांनी केली. भाजपला उशीरा शहाणपण सुचलं पण आता याला काहीही अर्थ उरला नाही असं म्हणत आता शिवसेना भाजपसोबत जाणार नाही असे स्पष्ट संकेत मनिषा कायंदे यांनी दिले आहेत.

इतर बातम्या - साईंच्या शिर्डीमध्ये एक-एक करून गायब होतायत लोक, उच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश

आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

- उत्तर महाराष्ट्रातील 12 जागांवर आमचा पराभव झाला. या 12 जागांचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. पराभव नेमका का झाला याचा अहवाल सादर करणार

- काँग्रेसचं देशात भारत बचाव आंदोलन. भारतात घुसलेल्या घुसखोरांना वाचवा ही काँग्रेसची भूमिका, ही काँग्रेसची नौटंकी

- नागरिक सुधारणा विधेयक देशासाठी आवश्यक आहे

- महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी हे देशहितासाठी विधेयक स्वीकारावं

- शिवसेनेनं आपला मूळ बाणा दाखवावा, कोणाला घाबरू नये. लोकसभेत समर्थन केलं पण राज्यसभेत पळून गेले

- मात्र सरकार वाचवण्यासाठी देशहित बाजूला ठेवू नका.

इतर बातम्या - फाशीच्या शिक्षेमुळे डिप्रेशनमध्ये आहेत निर्भयाचे आरोपी, जेवणही घश्याखाली जाईना!

- सरकार वाचवण्यासाठी भाजप शिवसेनेसोबत राजकीय तडजोड करायला तयार

- राष्ट्र सर्वप्रथम हा भाजपचा अजेंडा आहे. त्यामुळे नागरिक सुधारणा विधेयक अंमलबजावणी देशासाठी आवश्यक

- घुसखोरांना घालवलंच पाहिजे

- काँग्रेस आणी राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचं महाराष्ट्रात सरकार आहे पण राज्यातील सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेनं तडजोड करू नये

- देशहितासाठी भाजप शिवसेनेसोबत राजकीय तडजोड करायला तयार

- सत्ता आणि सत्तेसाठी राजकारण हा भाजपचा हेतू कधीच नव्हता

इतर बातम्या - देशभरात भाजपला घेरण्यासाठी काँग्रेस मैदानात, 'भारत बचाव' रॅलीतून दाखवणार ताकद

First published: December 14, 2019, 12:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading