गोळीबार, जाळपोळ आणि 7 जणांचा मृत्यू; दिल्ली हिंसाचाराचे 16 भीषण PHOTOS

नागरिकत्व कायदा दुरुस्ती (CAA) ने सुरू झालेल्या आंदोलानाने आता दिल्लीत हिंसक वळण घेतलं आहे.

  • Share this:

उत्तर पूर्व दिल्लीत तणावपूर्ण वातावरण तयार झालं आहे. ईशान्य दिल्लीत सोमवारी हिंसाचार झाला तर आज मंगळवारी मौजपूर आणि ब्रह्मपुरी भागात दगडफेक सुरू झाली. दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांच्यासह 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

मंगळवारी सकाळीही दिल्लीत परिस्थिती तणावपूर्ण आहे. सकाळी पाच मोटारसायकलींना आग लावण्यात आली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पहाटेच्या सुमारास मौजपूर आणि आसपासच्या भागात आग लागल्याचे अग्निशमन दलाला 45 फोन आले, ज्यामध्ये एका अग्निशमन इंजिनवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे अग्निशमन इंजिनला आग लागली. यामध्ये तीन फायरमन जखमी झाले आहेत.

दिल्ली पोलिसांनी नागरिकता सुधार कायद्या (CAA) विरोधात झालेल्या हिंचारामध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. शाहरुख असं बंदूक घेऊन गोळ्या झाडणाऱ्या तरुणाचं नाव असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

या तरुणाने ईशान्य दिल्लीमध्ये उफाळलेल्या हिंसाचारामध्ये जमावावर गोळीबार केला तर सध्या या पोलिसांच्या ताब्यात आहे.

नागरिकत्व कायद्याबाबत सोमवारी दिल्लीत हिंसक निदर्शने झाली. या हिंसक निदर्शनात पोलिस कॉन्स्टेबलसह 7 जणांचा मृत्यू झाला तर सुमारे 70 हून अधिक लोक जखमी असल्याची माहिती आहे.

ईशान्य दिल्लीच्या विविध भागांत सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) समर्थन आणि विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या वेळी एका युवकाने पोलिस कर्मचाऱ्यावर गोळीबार केला.

नागरिकत्व सुधार अधिनियम (CAA) च्या निषेधार्थ दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सोमवारी ईशान्य दिल्लीतील अनेक भागात हिंसाचारानंतर शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली  आहे.

मंगळवारी हिंसाचारग्रस्त ईशान्य दिल्लीतील शाळांमध्ये कोणत्याही वर्गाच्या परीक्षा होणार नाहीत आणि सर्व सरकारी व खासगी शाळा बंद राहतील असं सिसोदिया (Manish Sisodiya) म्हणाले आहेत.

दिल्ली पोलिसांनी संपूर्ण तणावपूर्ण वातावरण लक्षात घेत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

सीआरपीसीच्या कलम 144 अन्वये ईशान्य दिल्लीतील हिंसा प्रभावित भागात निषेधाचे आदेश लागू केले आहेत. याअंतर्गत, चार किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकाच ठिकाणी एकत्र येण्यास मनाई आहे.

पोलिसांनी सांगितले की, "पूर्वोत्तर दिल्ली, विशेषत: मौजपूर, कर्दमपुरी, चांद बाग आणि दयालपूर या भागात हिंसाचार व जाळपोळीच्या काही घटना घडल्या आहेत."

दरम्यान, काल सकाळपासून सुरू असलेला हा हिंसाचार आतापर्यंत सुरू आहे. आज सकाळच्या सुमारास ब्रम्हापूरी आणि मौजपूर इथे दोन गटांमध्ये दगडफेक करण्यात आली आहे.

दिल्ली हिंसाचार विरोधात मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात रात्री काही लोक आंदोलनाला बसली होती. हे प्रदर्शन शांतूपर्वक होतं. यावेळी पोलिसांनी काही लोकांना ताब्यातदेखील घेतलं.

मुंबई पोलीस डीसीपी संग्राम सिंह निशानदर यांच्या मते आंदोलनाची जागा आझाद मैदान आहे. मात्र, काही आंदोलनकर्ते गेटवे ऑफ इंडियाकडे जाऊ लागले. यावेळी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तर आंदोलनकर्ते मरीन ड्राईव्हकडे गेले. त्यामुळे जवळपास 25 ते 30 लोकांना ताब्यात घेतल्यांची माहिती निशानदार यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: delhi news
First Published: Feb 25, 2020 02:41 PM IST

ताज्या बातम्या