CAA च्या विरोधात वाद चिघळला; 75 वर्षांच्या वृद्धाने भर चौकात स्वत:ला जिवंत जाळलं

CAA च्या विरोधात वाद चिघळला; 75 वर्षांच्या वृद्धाने भर चौकात स्वत:ला जिवंत जाळलं

इंदूरच्या द्वारकापुरी पोलीस ठाण्यात राहणाऱ्या 75 वर्षीय रमेश प्रजापत गेल्या अनेक वर्षांपासून कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित आहे.

  • Share this:

इंदोर, 25 जानेवारी : CAA आणि NRC विरोधात संपूर्ण देशात वाद चिघळला असताना मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या एका वयोवृद्ध सदस्याने शुक्रवारी सीएए आणि एनआरसीच्या निषेधार्थ स्वत: ला पेटवून घेतले. शहरातील गीता भवन चौकात ही घटना घडली. मात्र, घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याचा बचाव केला आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमीला महाराज यशवंतराव रुग्णालयात पाठवण्यात आले. सध्या येथील बर्न युनिटवर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

इंदूरच्या द्वारकापुरी पोलीस ठाण्यात राहणाऱ्या 75 वर्षीय रमेश प्रजापत गेल्या अनेक वर्षांपासून कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित आहे. शुक्रवारी तुकोगंज पोलीस स्टेशन परिसरातील गीता भवन चौकाजवळ रमेश प्रजापत यांनी स्वत: ला आग लावून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर जवळपासच्या लोकांनी त्यांना कसे तरी वाचवले. पोलिसांना कळवल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली गेली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश यांत्या खिशातून पोलिसांना सीएएशी संबंधित काही पत्रकेही मिळाली आहेत.

इतर बातम्या - शिवसेनेच्या मुखपत्रातून राज ठाकरेंवर घणाघाती टीका, वाचा काय आहे अग्रलेख?

स्थानिक कम्युनिस्ट पार्टीच्या सदस्य आणि रमेश यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीने सांगितले की रमेश प्रजापत गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे सदस्य आहेत. जामा मशिदीत सध्या सुरू असलेल्या सीएएच्या निषेधांमध्येही त्यांचा सहभाग होता. त्याशिवाय सीएएचा निषेध करण्यासाठी रमेश प्रजापत आणि त्यांच्या कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांनी शहरातील विविध वस्त्यांमध्ये लोकांना भेटले होते. रमेश प्रजापत यांनी स्वत: ला का पेटवून दिले याविषयी अद्याप कोणतीही ठाम माहिती मिळाली नाही. पोलीस त्यांच्या व कुटूंबियांची जबाब नोंदवित आहेत आणि या प्रकरणाचा तपास करत आहेत.

इतर बातम्या - भीमा कोरेगाव हिंसेची चौकशी करणार NIA, केंद्राच्या निर्णयावर ठाकरे सरकार नाराज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 25, 2020 08:31 AM IST

ताज्या बातम्या