मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /दररोज फक्त 40 रुपये वाचवा आणि लखपती व्हा, ही आहे तुमच्या श्रीमंतीची किल्ली

दररोज फक्त 40 रुपये वाचवा आणि लखपती व्हा, ही आहे तुमच्या श्रीमंतीची किल्ली

दररोज काही पैसे साचवल्यास तुमची मोठी बचत होऊ शकते. आणि ते पैसे तुम्ही महिन्याखेरीस म्युच्युअल फंडात साठवल्यास तुम्ही लखपतीही होऊ शकता.

दररोज काही पैसे साचवल्यास तुमची मोठी बचत होऊ शकते. आणि ते पैसे तुम्ही महिन्याखेरीस म्युच्युअल फंडात साठवल्यास तुम्ही लखपतीही होऊ शकता.

दररोज काही पैसे साचवल्यास तुमची मोठी बचत होऊ शकते. आणि ते पैसे तुम्ही महिन्याखेरीस म्युच्युअल फंडात साठवल्यास तुम्ही लखपतीही होऊ शकता.

 नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : आजकाल प्रत्येकजण पैशांच्या मागे धावताना दिसत आहे. प्रत्येकालाच श्रीमंत व्हायचं आहे. काहींना श्रीमंत होण्यासाठी शॉर्टकटही घ्यायचा असतो. काहींना असं वाटतं जितका पैसा कमी तितकं श्रीमंत होण्याचा मार्ग धुसर असतो. जर तुम्ही सुद्धा असा विचार करत असाल तर थांबा. कारण कमी पैशातही आपण श्रीमंत होऊ शकतो. होय, तुमच्याकडे कमी पैसे असले तरी तुम्ही  रोज पैशांची थोडी थोडी बचत करून श्रीमंत होऊ शकता.

तुम्ही रोज काही पैशांची बचत करायला सुरुवात करा.एक काळ असा येईल की तुम्ही लखपती झालेले असाल. आणि तुम्हाला लखपती करण्यासाठी म्युच्युअल फंड मदत करेल. विशेष म्हणजे तुम्ही रोज 40 रुपयांची बचत करून मोठी रक्कम साठवू शकता आणि असं केल्यास तुमच्यावर अधिक भारही येणार नाही आणि रोजच्या खर्चाव्यतिरिक्त तुम्ही अगदी सहजपणे पैशांची बचत करू शकता.

हेही वाचा- राशीभविष्य : तुळ आणि मिथुन राशीच्या लोकांनी ठेवायला हवं आज रागावर नियंत्रण

रोज 40 रुपयांची बचत करत साठवू शकता 8 लाख रुपये

जर तुम्ही रोज 40 रुपयांची बचत केली तर महिन्याखेरीस तुमच्याकडे 1 हजार 200 रुपये असतील आणि दर महिन्याला 1200 रुपये तुम्ही SIP च्या आधारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकता. आणि ही गुंतवणूक तुम्हाला जवळपास 15 वर्ष करावी लागेल. गुंतवणूक बाजारपेठेत असे अशा अनेक म्युच्यअल फंड स्कीम उपलब्ध आहेत. ज्या तुम्हाला 15 वर्षात 15 टक्क्यांनी तुम्ही गुंतवलेली रक्कम परत करतात. आणि जर तुम्हाला गुंतवणूक केलेली रक्कम 15 टक्क्यांनी वाढवून मिळाली तर 15 वर्षात तुमच्याकडे 8 लाख इतकी रक्कम साठवलेली असेल.

कशाप्रकारे होईल गुंतवणूकीचा फायदा

जर तुम्ही कोणत्याही म्युच्युअल फंडात 15 वर्ष गुंतवणूक केली तर तुमची एकूण गुंतवणूक 2 लाख 15 हजार इतकी होईल. तर तुमच्या एसआयपी (SIP) ची किंमत 8 लाख 2 हजार 208 रुपये होईल. म्हणजेच तुम्हाला 5 लाख 86 हजार 208 रुपयांचा फायदा होईल.

म्युच्युअल फंडमध्ये काही स्कीम्स आहेत ज्या तुम्हाला 15 वर्षानी परताव्याची किंमत 15 टक्क्यांनी वाढवून देतात. आदित्य बिर्ला सन लाइफ इक्विटी फंडमध्ये 15 वर्षात तुम्हाला 15.20 टक्के, डीएसपी इक्विटी अपॉर्च्युनिटी फंडमध्ये 14.67 टक्के, फ्रँकलिन इंडिया प्राइमा फंडमध्ये तुम्हाला परताव्याची किंमत 15.07 टक्क्यांनी वाढवून परत केली जाते. अशा म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही आतापासूनच पैसे गुंतवण्यास सुरुवात केली तर एक दिवस तुम्ही नक्कीच लखपती व्हाल.

हेही वाचा- Maha Shivratri 2020: महाशिवरात्र का साजरी करतात? हे कारण तुम्हाला माहीत आहे का?

 

First published:
top videos

    Tags: Investment and return, Mutual fund, Mutual fund investment advice