नव्या वर्षात कार घ्यायचीय? मग हे आहेत स्वस्त आणि मस्त पर्याय

नव्या वर्षात कार घ्यायचीय? मग हे आहेत स्वस्त आणि मस्त पर्याय

कार घेण्याची हौस अनेकांना असते. मात्र किंमतीमुळे ते अनेकांना परवडत नाही. मात्र आता सेकंडहॅंन्ड कार घेण्याचा एक चांगला पर्याय समोर आला आहे.

  • Share this:

मुंबई, 27 डिसेंबर : यंदाच्या वर्षी कोरोना (corona) महामारीमुळे ऑटो सेक्टरला (auto sector) सर्वाधिक फटका बसला आहे. मार्च महिन्यापासूनच कार्सची खरेदी-विक्री बरीच कमी झाली आहे. तसं पाहता दिवाळीनंतर बाजार थोडाबहुत पूर्वपदावर आला आहे. जर तुम्हालाही नव्या वर्षाच्या मुहूर्तावर कार (car) खरेदी करायची आहे, तर कमी बजेटमध्ये हा आनंद कशा प्रकारे घरी आणता येऊ शकेल हे जाणून घ्या.

'जनसत्ता'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. देशात सेकंड हॅन्ड (second hand) किंवा वापरलेल्या गाड्यांचं चलन पूर्वापार आहे. दिवसेंदिवस ते वाढतानाही दिसतं. आता लोक नव्या कार्सऐवजी सेकंड हॅन्ड गाड्या विकत घेण्यावर जास्त जोर देतात कारण त्यांना या सौद्यात खूप कमी बजेटमध्ये बरंच काही चांगलं मिळतं. तसं पाहता अमेरिका आणि कॅनडासारख्या विकसित देशांमध्येही लोक नव्याऐवजी जुन्या, सेकंडहँड गाड्या घेणं जास्त पसंत करतात. कारण फक्त एक वर्ष चाललेल्या गाड्या नव्या गाडीच्या तुलनेत जवळपास 30 टक्क्यांपर्यंत स्वस्त होतात. यातून बऱ्याच पैशांची बचत होते.

नव्या वर्षात विकत घेतल्या जाणाऱ्या युज्ड कार्समध्ये मारुती, होंडा, ह्युंदाई अशा लोकप्रिय कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश होतो. सगळ्यात पहिल्यांदा ह्युंदाई क्रेटाबाबत बोलायचं, तर ही मागच्या काही वर्षात सर्वाधिक मागणी असलेली कार आहे. हिचं नवं मॉडेल आलं असलं तरी जुन्या मॉडेलची क्रेझ अजूनही कायम आहे. या मॉडेलमध्ये सर्व क्वालिटीज आणि फीचर्स आहेत. तसंही या कारची खरेदी कुठलाच संभ्रम न बाळगता केली जाऊ शकते. सोबतच मारुती स्विफ्ट डिजायरबाबत बोलायचं झालं, तर ही अशी कार आहे, जी प्रत्येक वर्गातल्या लोकांना आवडते. सोबतच स्विफ्ट डिजायर बजेटबाबतही आवाक्यात आहे. या कारचं बेस मॉडेल 5 लाखांपर्यंत खरेदी करता येऊ शकतं.

सोबतच जुन्या कार्सच्या बाजारात होंडा सिविकसारख्या सेडान कार्सही आहेत. सिविकच्या 2012-14 च्या मॉडेलची विक्रीही खूप झाली होती. त्यामुळे जर तुम्हाला ही गाडी मिळते आहे, तर मग याहून मस्त ते काय! सध्या जुन्या सिवीकची किंमत 3 ते 4 लाखाच्या दरम्यान  आहे. ही किंमत याच कारच्या नव्या मॉडेलहून 20 ते 25 टक्के कमी आहे.

याशिवाय शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत जास्त मागणी असणारी स्कॉर्पिओपण जुन्या गाड्यांच्या रांगेत चांगलं स्थान मिळवून बसलेली दिसते. जगभर प्रसिद्ध असलेली टोयोटाची प्रसिद्ध फॉर्च्युनरही या यादीत आहे. या कारची शोरूम प्राइस जवळपास 40 लाखांपर्यंत असते मात्र तुम्हाला या कारचं जुनं मॉडेल 13 ते 18 लाखांपर्यंत मिळू शकतं.

मात्र वापरलेली गाडी विकत घेताना तिला अतिशय चांगल्या प्रकारे तपासलं पाहिजे. गाडीचा रंग, टायर, बॅटरी, सीट आणि डेन्ट यांची तपासणी महत्त्वाची आहे. इंजिन आणि मायलेजवरही लक्ष दिलं पाहिजे.

Published by: News18 Desk
First published: December 27, 2020, 4:52 PM IST

ताज्या बातम्या