सेकंडहँड गाड्यांच्या मार्केटमध्ये झगमगाट; स्वस्तात खरेदी करता येईल तुम्हाला BMW आणि फॉर्च्‍यूनर

सेकंडहँड गाड्यांच्या मार्केटमध्ये झगमगाट; स्वस्तात खरेदी करता येईल तुम्हाला BMW आणि फॉर्च्‍यूनर

स्वस्तात खरेदी करता येतील तुम्हाला प्रीमियम हॅचबॅक पासून ते सेडान आणि SUV

  • Share this:

नवी दिल्ली, 12 मे : भारतात वापरलेल्या गाड्यांची विक्री करण्याचा व्यवसाय चांगलाच जोमात आहे. सेकंडहँड गाड्यांच्या या मार्केटमध्ये तुम्हाला प्रीमियम हॅचबॅक पासून ते सेडान आणि स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल (SUV) सुद्धा स्वस्तात खरेदी करता येतील. या गाड्या तुम्हाला नव्या गाड्याच्या एक्स शोरूम किमतीच्या तुलनेत 50 टक्के कमी दराने खरेदी करता येतील. किमान 10 वर्ष जुन्या गाड्या यात उपलब्ध असतात.

अनेक नामांकित कंपन्यांच्या सर्टि‍फाइड कार तुम्हाला यात खरेदी करता येतील. गाडीची पूर्ण तपासणी केल्यानंतरच या गाड्या विकल्या जातात. सोबतच, या या गाड्या खरेद करताना फायनान्स सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाते. इथे आम्ही तुम्हाला काही ऑप्शन्स सांगणार आहोत जे तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येतील.

Xioami च्या कमी किमतीच्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये आहे 32 मेगापिक्सलचा कॅमेरा; ‘ही’ आहेत फिचर्स

बीएमडब्ल्यू 5 सीरीज 525i 2008 या मॉडलची एक्स शोरूम किंमत 47.7 लाख रुपये आहे. पण बीएमडब्ल्यूची चमचमती कार तुम्ही फक्त 5.87 लाख रुपयांत खरेदी करू शकता. यात 2497 सीसीचं पेट्रोल इंजिन आहे जे 215 bhp पावर जनरेट करतं. आणि प्रति लीटर 6 किलोमीटर असं या कारचं मायलेज आहे.

लक्झरी कार मर्सिडीज-बेंझच्या E-Class माडेलसाठी तुम्हाला फक्त 9.75 लाख रुपये खर्च करावे लागतील. या मॉडेलमध्ये 2987 सीसीचं डिझेल इंजिन असून ते 210 bhp पावर जनरेट करतं. प्रति लीटर 11.5 किलोमीटर असं या कारचं मायलेज आहे.

Mothers Day निमित्त आईला द्या गिफ्ट; उत्तम फीचर्स आणि स्वस्तात मिळताहे ‘हे’ 5 फोन

टोयोटाची SUV फॉर्च्‍यूनर या कारचं सेकंडहँड मॉडेलसुद्धा तुम्हाला या मार्केटमध्ये खरेदी करता येईल. टोयोटो फॉर्च्‍यूनर 3.0 4X4 MT 2010 या मॉडलची एक्‍स शोरूम किंमत 23.2 लाख रुपये आहे. पण युज्‍ड कार मार्केटमध्ये तुम्हाला ही गाडी 10.52 लाख रुपयांत खरेदी करता येईल. यात 2982 सीसीचं डिझेल इंजिन असून ते 169 bhp पावर जनरेट करतं. प्रति लीटर 12 किलोमीटर असं या गाडीचं मायलेज आहे.

First published: May 12, 2019, 5:43 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading