रिलायन्स जिओ वर्षभरात देणार 80 हजार नोकऱ्या!

रिलायन्स जिओ वर्षभरात देणार 80 हजार नोकऱ्या!

रिलायन्स जिओ यावर्षी तब्बल 75 ते 80 हजार नोकऱ्या देणार आहे. जिओनं 2018-19 या वर्षात 75 ते 80 हजार नोकऱ्या देण्याचं उद्दीष्ट ठेवलं आहे.

  • Share this:

मुंबई,ता.27 एप्रिल: रिलायन्स जिओ यावर्षी तब्बल 75 ते 80 हजार नोकऱ्या देणार आहे. डिजिटल क्षेत्रात जगातली अग्रणी कंपनी असलेल्या जिओनं 2018-19 या वर्षात 75 ते 80 हजार नोकऱ्या देण्याचं उद्दीष्ट ठेवलं आहे अशी माहिती रिलायन्स जिओ चे चीफ ह्यूमन रिसोर्स ऑफिसर संजय जोग यांनी दिली आहे.

सोसायटी ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.  रिलायन्स जिओत सध्या 1 लाख 57 हजार कर्मचारी आहेत. रिलायन्स जिओनं 4G सेवा सुरू केल्यानंतर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या सेवेमुळं देशात डिजिटल क्रांती आली आहे असंही जोग यांनी सांगितलं.

अशा होतील नियुक्त्या

  • देशातल्या 6 हजार कॉलेजेस सोबत सामंजस्य करार.
  • यातल्या अनेक कॉलेजेसमध्ये इड्स्ट्रीशी संबंधीत अभ्यासक्रम चालवले जातात.
  • सोशल मीडियाच्या माध्यमातूनही इच्छुक तरूणांना संपर्क साधता येईल.
  • 'रेफरल हायरिंग' च्या माध्यमातूनही संधी मिळणार, त्याचं प्रमाण 60 ते 70 टक्के असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2018 03:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading