1 लाख रुपयांमध्ये सुरू करा हा व्यवसाय, दर महिन्याला कमवा 15 हजार रुपये

Mudra Scheme - तुम्हाला कमी पैशात बिझनेस सुरू करायचा असेल तर सरकार तुम्हाला मदत करेल

News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2019 08:09 PM IST

1 लाख रुपयांमध्ये सुरू करा हा व्यवसाय, दर महिन्याला कमवा 15 हजार रुपये

मुंबई, 19 जुलै : तुम्हाला व्यवसाय सुरू करायचाय? आणि तोही कमी पैशात? मग तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. यात तुम्ही कमी पैसे गुंतवून महिन्याला चांगली कमाई सुरू करू शकता. तुमच्याकडे 1 लाख रुपये असले आणि तुम्हाला तुमच्या शहरात राहून व्यवसाय करायचा असेल तर सरकार तुमची मदत करू शकतं. तुम्ही गुंतवणुकीतून दर महिना 14 हजार रुपये कमाई करू शकता.

व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार तुम्हाला मुद्रा स्कीम अंतर्गत मदत करू शकतं. सरकारनं त्यासाठी एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केलाय. तुम्हाला तुमच्याकडचे 1 लाख रुपये गुंतवायचे आहेत.

मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे शेअर बाजार गडगडला; 2 लाख कोटींचं नुकसान

सुरू करा हा व्यवसाय

तुम्ही मेटलच्या वस्तू बनवण्याचं युनिट सुरू करू शकता. मेटलच्या वस्तू बनवण्याच्या युनिटद्वारे तुम्ही कटलरीपासून हँड टूलपर्यंत, अगदी शेतीसाठी लागणारी काही साधनंही बनवू शकता. स्वयंपाकघरात लागणाऱ्या छोट्या, आकर्षक चमच्यांना मागणी असते. तुम्ही तुमच्या प्राॅडक्टचं मार्केटिंग उत्तम प्रकारे केलंत तर तुमचा व्यवसाय आणखी वाढू शकतो. या अहवालानुसार तुम्हाला व्यवसाय सुरू करण्याचा  खर्च 3.30 लाख रुपये येऊ शकतो. त्यात 2.16 लाख रुपये सरकार मदत करेल.

Loading...

सोन्या-चांदीच्या भावात झाले मोठे बदल, 'हे' आहेत नवे दर

असा होईल खर्च

सेटअपवर खर्च - 1.80 लाख रुपये

यात मशीन्स येतात. म्हणजे वेल्डिंग सेट, बफिंग मोटर, बेंच ग्रिंडर, हँड ड्रिलिंग, हँड ग्रिंडर, बेंच, पॅनल बोर्ड आणि इतर साधनं.

कच्च्या मालावर खर्च - 1.20 लाख रुपये ( 2 महिन्यांचा कच्चा माल )

या कच्च्या मालात दर महिन्याची 40 हजार कटलरी, 20 हजार हँड टूल आणि 20 हजार शेतीची साधनं बनू शकतात

पगार आणि इतर खर्च - दर महिना 30 हजार रुपये

एकूण खर्च - 3.3 लाख रुपये

एजंट स्मिथपासून राहा सावधान, नाही तर एका झटक्यात रिकामं होईल बँक अकाउंट

यात तुमचा खर्च असेल 1.14 लाख रुपये. बाकीचा खर्च सरकार देतं. त्यात 1.26 लाख रुपये टर्म लोन आणि 90 हजार रुपयांचं वर्किंग कॅपिटल कर्ज सरकार देतं.

अशी होईल कमाई

या अहवालानुसार 1.10लाख रुपये महिन्याला विक्री होईल. त्यासाठी खर्च 91, 833 रुपये येईल. म्हणजे नफा जवळजवळ 18,167 रुपये होईल. यात 13 टक्के कर्जाच्या व्याजानुसार दर महिन्याला 2340 रुपये जमा करावे लागतील. इंसेंटिव्हचा खर्च 1 टक्क्याच्या हिशेबानं 1100 रुपये येईल. म्हणजे एकूण नफा 14,427 रुपये होईल.

करू शकता अर्ज

या योजनेअंतर्गत तुम्ही कुठल्याही बँकेत अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला फाॅर्म भरावा लागेल. त्यात नाव, पत्ता, व्यवसायाचा पत्ता, शिक्षण, मिळकत आणि किती कर्ज हवं ते तुम्हाला सांगावं लागेल.

SPECIAL REPORT : औरंगाबादेत 'जय श्रीराम'च्या घोषणेसाठी तरुणाला बेदम मारहाण, काय आहे प्रकरण?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 19, 2019 08:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...