यवतमाळमध्ये बस पुलावरून नाल्यात कोसळली, चालकासह 7 प्रवासी गंभीर जखमी

यवतमाळमध्ये बस पुलावरून नाल्यात कोसळली, चालकासह 7 प्रवासी गंभीर जखमी

दारव्हा आगराची बस म्हसोला या गावातून आर्णीकडे जात असतांना पुलावरून घसरल्यामुळे मोठा अपघात झाला आहे.

  • Share this:

यवतमाळ, 26 ऑगस्ट : दारव्हा आगराची बस म्हसोला या गावातून आर्णीकडे जात असतांना पुलावरून घसरल्यामुळे मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 7 जण जखमी झाले असून त्यापैकी 3 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.  अलीकडेच आलेल्या पुरामुळे म्हसोला गावाला लागून असलेल्या पुलावर मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. या गाळामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट पुलावरून खाली पाण्यात कोसळली आणि नाल्यात जाऊन आदळली.

या भीषण स्नेहलता पेटकर, यश ऊके, वाहक व्हि. राठोड यांना गंभीर मार लागला असुन इतर प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच गावकरी घटना स्थळावर जमा झाले आणि त्यांनी जखमींना  आर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालायत उपचार सुरू आहे.

सुदैवाने या अपघातात सगळे सुखरूप आहेत. पण काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.  नेमका अपघात कसा झाला याचा पोलीस शोध घेत आहेत.

 

फाटलेल्या नोटा बदलण्याचा सोपा उपाय, 'RBI'ने सांगितले हे चार नियम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 26, 2018 03:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading