दहन की दफन? आईच्या अंत्यसंस्कारावरुन दोन भावांमधील वाद टोकाला; पालघरमधील घटना

दहन की दफन? आईच्या अंत्यसंस्कारावरुन दोन भावांमधील वाद टोकाला; पालघरमधील घटना

शेवटी पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला आणि त्यानंतर अखेर...

  • Share this:

ठाणे, 21 नोव्हेंबर : राज्यातील (Maharashtra) पालघरमध्ये (Palghar) एका आईच्या अंत्यसंस्काराच्या पद्धतीबाबत दोन भावांमधील वादामुळे 1998 मध्ये आलेल्या महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांचा अजय देवगन (Ajay Devgan) अभिनीत चित्रपट 'ज़ख्म'ची आठवण आली. महाराष्ट्रातील पालघरमध्ये काही वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या एका महिलेला तिच्या एता मुलाने दफन केलं. तर तिच्या दुसऱ्या मुलाने सांकेतिक स्वरुपात तिचं दहन केलं. पोलिसांनी शनिवारी याबाबत माहिती दिली.

ही घटना पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अवांडे गावात दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली आहे. दिवंगत महिलेची दोन मुलं आहेत. आईचे अंत्यसंस्कार कोणत्या पद्धतीने करायचं यावरुन दोघांमध्ये वाद सुरू होता. यांच्यातील एक मुलगा ख्रिश्चन तर दुसरा हिंदू आहे.

पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार (Dilip Panwar) यांनी सांगितलं की, ‘‘65 वर्षीय फुलाई धाबडे यांचा 18 नोव्हेंबर रोजी रात्री मृत्यू झाला. त्या व त्यांचा पती महादू आणि छोटा मुलगा सुधान काही वर्षांपूर्वी धर्मांतर करुन ख्रिश्चन झाले होते. मात्र त्यांच्या मोठ्या मुलाने धर्मांतर केलं नाही, त्याने हिंदू राहणं पसंत केलं. पवार यांनी सांगितलं की, आईच्या मृत्यूनंतर तिच्यावर कोणत्या पद्धतीने अंत्यसंस्कार केले जावेत यावरुन दोन्ही भावांमध्ये वाद सुरू झाला. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. दोघांनाही ते पालन करीत असलेल्या धर्मानुसार आईवर अंत्यसंस्कार करण्याची इच्छा होती.

हे ही वाचा-कानात इअरफोन लावून रेल्वे ट्रॅकवर चालत होते तरुण; अपघातात दोघांचाही मृत्यू

यामुळे गावकरी मोठ्या संख्येने तेथे जमा झाले. दोन्ही भावांपैकी कोणी मागे हटायला तयार नव्हतं. यामध्ये पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला. पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार पुढे म्हणाले की, पोलीस अधिकारी सुधीर सांखे (Sudheer Sankhe) गावात पोहोचले आणि त्यांनी कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केली. तेव्हा महिलेवर अंत्यसंस्कार ख्रिश्नन पद्धतीने होणार असल्याचं ठरवलं. त्यानंतर वसईजवळी पाचू द्विपयेथे पार्थिव दफन करण्यात आले.

Published by: Meenal Gangurde
First published: November 21, 2020, 9:55 PM IST
Tags: palghar

ताज्या बातम्या