Elec-widget

अमेरिकेतलं शेफचं काम सोडून सुरू केला नवा बिझनेस, 5 वर्षांत उभारली 26 कोटींची कंपनी

अमेरिकेतलं शेफचं काम सोडून सुरू केला नवा बिझनेस, 5 वर्षांत उभारली 26 कोटींची कंपनी

देशभरातच फूड स्टार्टअप कंपन्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. असाच एक नवा प्रयोग आहे, स्टार्टअप बर्गर सिंह.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 डिसेंबर : देशभरातच फूड स्टार्टअप कंपन्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. असाच एक नवा प्रयोग आहे, स्टार्टअप बर्गर सिंह. यामध्ये 100 टक्के भारतीय पदार्थ मिळतात,असा दावा केला जातो. भारतीय ढंगातल्या या बर्गरने मुलांपासून ते तरुणांची पसंती मिळवलीय.

स्वदेशी आयडिया

परदेशी ढंगाच्या बर्गरला बर्गर सिंहने देशी स्वाद मिळवून दिला. अमेरिकेत शेफचं काम करणारे कबीर जीत सिंह यांनी तिथली नोकरी सोडून बर्गरचा बिझनेस करायचं ठरवलं आणि त्याचं भारतीय रूप बाजारात आणलं. याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळायला लागल्यावर पावभाजी, चना बर्गर, मुर्ग मखनी असे प्रकारही आणले.

गुंतवणूकदारांनी केली मदत

गुंतवणूकदारांना ही चटपटीत आयडिया फारच आवडली. बर्गर सिंहला एंजल इन्व्हेस्टर्सकडून 43 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली. त्यामुळे कंपनीचा विस्तार आणखीनच वाढला.

Loading...

मागच्या 5 वर्षांत या ब्रँडने 26 आउटलेट्स काढून प्रगती केली. बर्गर सिंहने देशभरातच नव्हे तर लंडनमध्येही दोन ब्रँच उघडल्या आणि भारतीय स्वाद परदेशात पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

(हेही वाचा : कांदा पुन्हा झाला महाग, या कारणांमुळे जाऊ शकतो 140 रुपयांवर)

लंडनप्रमाणेच आणखीही विस्तार

याप्रमाणेच आणखीही काही ठिकाणी ही कंपनी आपल्या कंपनीचा विस्तार करण्याचा प्रयत्न करतेय. स्वदेशी आणि जंक फूडचा मिलाफ साधून बर्गर सिंहने केलेला हा प्रयोग सगळ्यांच्याच पसंतीस उतरलाय.

कबीर जीत सिंह यांनी अमेरिकेतली नोकरी सोडून काहीतरी नवं करण्याचं धाडस केलं आणि त्यात ते यशस्वीही झाले. त्यांची ही खाद्ययात्रा अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

=====================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2019 07:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com