मोठी बातमी ! आता 4 तास आधीच विमानतळावर पोहोचावंच लागेल कारण ...

मोठी बातमी ! आता 4 तास आधीच विमानतळावर पोहोचावंच लागेल कारण ...

Airport, Article 370 - सर्वच विमानतळांवरची सुरक्षा व्यवस्था वाढवली गेलीय

  • Share this:

मुंबई, 08 ऑगस्ट : तुम्ही विमानानं कुठे प्रवास करणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चिडलेत. ते काहीही बरळतायत. म्हणून मोदी सरकारनं  दहशतवादी हल्ल्याची शंका असल्यानं सुरक्षेची पूर्ण काळजी घेतलीय. म्हणून देशातल्या सर्व विमानतळांवरची सुरक्षा वाढवलीय. त्यामुळे देशात विमान प्रवास असेल तर 3 तास आधी विमानतळावर पोचावं लागेल आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करायचा असेल तर 4 तास आधी विमानतळावर पोचावं लागेल. विमानतळावर ड्रोन, माॅडल आणि मायक्रोलाइट एअरक्राफ्ट सुरक्षेसाठी तैनात असतील.

30 ऑगस्टपर्यंत लागू हा आदेश

नागरिक उड्डाण सुरक्षा ब्युरोनं सांगितलंय की स्वातंत्र्य दिनाच्या सुरक्षेला घेऊन हे पाऊल उचललं गेलंय. नवा नियम 10 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत लागू राहील. एरवी देशातल्या विमानप्रवासासाठी 2 तास आणि आंतरराष्ट्रीय विमानप्रवासासाठी 3 तास अगोदर जावं लागायचं.

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत मिळतात बँकेपेक्षा जास्त पैसे, अशी करा गुंतवणूक

30 ऑगस्टपर्यंत विमानतळावर व्हिजिटर पास नाही मिळणार. ब्युरोनं व्हिजिटर्सची एंट्री बंद केलीय.

सर्व कार्सची होईल तपासणी

विमानतळावर येणाऱ्या सर्व कार्सच्या तपासण्या होतील. कुठलीही कार पार्किंगमध्ये उभी असेल, तर तिचीही तपासणी होईल. सर्वच प्रवाशांना विमानतळावर एंट्री केल्यानंतर विमानात चढेपर्यंत बऱ्याच तपासण्यांना तोंड द्यावं लागेल.

खूशखबर, आज पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, 'हे' आहेत तुमच्या शहरातले दर

प्रवाशांप्रमाणे आता पायलट, क्रू स्टाफ, ग्राउंड स्टाफसह सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी होईल.

याशिवाय कोणी दारू प्यायली नाही ना हेही तपासलं जाईल. प्रवासी आणि केबिन क्रू, पायलट, कर्मचारी सगळ्यांनाच यातून जावं लागेल.

ट्रॅफिक सिग्नल तोडून महिलेनंच घातला राडा, पोलिसाच्या अंगावर चढवली गाडी

BCAS नं सांगितलं की ब्रेथ एनालाइजर टेस्टमध्ये दारू पिणारा आढळला तर कडक कारवाई केली जाईल. यात पायलटचं लायसन्सही रद्द होऊ शकतं. कर्मचाऱ्यांची नोकरीही जाऊ शकते.

VIDEO: सांगलीतील पूरस्थिती 'जैसे थे' बचावकार्य सुरू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: airport
First Published: Aug 8, 2019 01:19 PM IST

ताज्या बातम्या