कुख्यात गुन्हेगार होणार RJ; तुरुंगात उभं राहतंय रेडिओ स्टेशन

कुख्यात गुन्हेगार होणार RJ; तुरुंगात उभं राहतंय रेडिओ स्टेशन

हे रेडिओ स्टेशन कैदीच चालवणार असून,अगदी रेडिओ जॉकी(Radio Jockey)म्हणूनदेखील कैदीच(Prisoners)काम करणार आहेत.

  • Share this:

मुंबई 17 एप्रिल: कैदयांच्या पुनर्वसनासाठी देशातील वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये अनेक उपक्रम राबवले जातात. कैद्यांना व्यावसायिक शिक्षण दिलं जातं. औपचारिक शिक्षण घेण्याचीही संधी दिली जाते. कैद्यांचे मानसिक आरोग्य चांगलं राहावं,सकारात्मकता निर्माण व्हावी या दृष्टीनं प्रयत्न केले जातात. अल्प शिक्षा झालेल्या,किरकोळ गुन्ह्यासाठी किंवा पहिल्याच गुन्ह्यासाठी तुरुंगात आलेल्या कैद्यांना तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर स्वतःच्या पायावर उभं राहता यावं,पुन्हा गुन्हेगारीकडं वळावं लागू नये यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जातात. मुक्त कारागृहासारखे उपक्रमही देशात ठिकठिकाणी राबवण्यात येत आहेत. यामुळे पश्चाताप झालेल्या, तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर चांगले आयुष्य जगण्याची इच्छा असलेल्या गुन्हेगारांना चांगली संधी निर्माण झाली आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना स्थान मिळत आहे. कैद्यांच्या कल्याणाचा असाच एक अभिनव उपक्रम पंजाबमधील चंदीगड इथं असलेल्या बुरैल मॉडेल तुरुंगात राबवण्यात येत आहे. इथं चक्क तुरुंगात कम्युनिटी रेडिओ स्टेशन(Community Radio Station)उभारण्यात येत आहे. हे रेडिओ स्टेशन कैदीच चालवणार असून,अगदी रेडिओ जॉकी(Radio Jockey)म्हणूनदेखील कैदीच(Prisoners)काम करणार आहेत. यामुळे इथल्या कैद्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

दी इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार,याकरता तुरुंग प्रशासनानं(Jail Administration)निविदा(Tenders)काढल्या असून,40 लाखांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. लवकरच योग्य कंपनीची निवड करून कंत्राट दिलं जाईल आणि रेडिओ स्टेशन उभारलं जाईल,अशी माहिती तुरुंग विभागाचे सहायक महानिरीक्षक विराट यांनी दिली आहे.

रेडिओ जॉकी म्हणून काम करण्यासाठी आठ ते दहा कैद्यांनी तयारी दर्शवली असून,त्यांना चंडीगडमधील व्यावसायिक रेडिओ जॉकी प्रशिक्षण देणार आहेत. काही कैदी रेडिओ स्टेशनची प्रोग्रामिंग,सॉफ़्टवेअर सिस्टीम आदी तांत्रिक बाजू सांभाळणार आहेत. त्यांना चंडीगड आकाशवाणीचे कर्मचारी(AIR Chandigarh)प्रशिक्षण देणार आहेत,असंही विराट यांनी सांगितलं.

या रेडिओ स्टेशनवरून संगीत,प्रेरणादायी कथा,आरोग्यासाठी डॉक्टरांचा सल्ला,ताज्या घडामोडींच्या माहितीसाठी वृत्तपत्र वाचन असे कार्यक्रम प्रसारित केले जाणार आहेत. मानसिक आरोग्यासाठी वाद्यसंगीत,शास्त्रीय संगीत लावलं जाणार आहे. हे कार्यक्रम प्रत्येक कैद्याला ऐकता यावेत याकरता प्रत्येक बराकीत स्पीकर्स बसवले जाणार आहेत,असंही विराट यांनी सांगितलं.

First published: April 17, 2021, 12:44 PM IST

ताज्या बातम्या