शिवसेना, मनसेचा विरोध डावलून बुलेट ट्रेनचं पहिलं टेंडर निघालं

शिवसेना, मनसेचा विरोध डावलून बुलेट ट्रेनचं पहिलं टेंडर निघालं

अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनच्या मार्गातील पुलांच्या कामाचं पहिलं टेंडर गुरुवारी नॅशनल हाय स्पीड रेल कार्पोरेशन लिमिटेड (NHSRCL)ने काढलं.

  • Share this:

नवी दिल्ली,ता.6 जुलै : देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनची टेंडर प्रक्रिया अखेर सुरु झालीये. अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनच्या मार्गातील पुलांच्या कामाचं पहिलं टेंडर गुरुवारी नॅशनल हाय स्पीड रेल कार्पोरेशन लिमिटेड (NHSRCL)ने काढलं. गुजरात आणि महाराष्ट्रातील काही भागात जमिन अधिग्रहणावरुन मोठा विरोध होत असताना ही टेंडर प्रक्रिया सुरु झालीये हे विशेष. डिसेंबर २०१८ पासून बांधकामाला सुरुवात होईल असं रेल कार्पोरेशनच्या प्रवक्त्यांनी सांगितलंय.

गुजरातमधल्या नवसारी जिल्ह्यात पुल बांधण्यासाठीचे टेंडर गुरुवारी काढण्यात आले. ५०८ किलोमीटरच्या बुलेट ट्रेनच्या मार्गात ६० उड्डाणपुल असणार आहेत. बुलेट ट्रेनचं ७० टक्के काम जपानी कंपन्यांना देण्यात आलंय. २०२३सालापर्यंत मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन सुरु कऱण्याचा मोदी सरकारचा मानस आहे.

'सेनाभवनावर बाळासाहेबांच्या चरणाशी शिवरायांचा फोटो,मग हा अपमान होत नाही का?'

नवाज शरीफ यांना 10 वर्षांची शिक्षा, इस्लामाबादमध्ये का आहे तणाव?

मात्र पालघरमध्ये बुलेट ट्रेनच्या जमिन अधिग्रहणाला मनसे शिवसेनेच्या नेत्वृत्वाखाली शेतक-यांनी मोठा विरोध सुरु ठेवलाय. पालघरमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ७३ खेडेगावांमधील ३०० हेक्टर जमिनीचं अधिग्रहण केलं जाणार आहे. या गावांचे प्रमुख आणि रेल कार्पोरेशनचे अभियंते मिळून सध्या जागेची संयुक्त मोजणी सर्वे करताय.

'विधान भवन परिसरात दारूच्या बाटल्या आणल्या कुणी?'

शेतकऱ्यांची क्रूर थट्टा, पीक विम्याचा मिळाला फक्त एक रूपया

या प्रकल्पाबद्दलचे लोकांचे गैरसमज दुर करु. शेतक-यांच्या सिंचन प्रकल्पांना आम्ही धक्का लावणार नाही. उलट चांगल पॅकेज, आरोग्यसुविधा, रोजगार उपलब्ध करुन देऊ असं सांगत संवाद साधण्याच काम सध्या सुरु आहे. १० हजार कोटी रुपये जमिन हस्तांतरणासाठी राखीव ठेवण्यात आले असून जमिन अधिग्रहणातील अडचणी दुर होती असा विश्वास रेल कार्पोरेशनने व्यक्त केलाय. मात्र १४०० हेक्टर पैकी केवळ ०.९ हेक्टर जमिन हस्तांतरण झालेली असताना टेंडर प्रक्रिया सुरु करुन वेळेत हा प्रकल्प मार्गी लावू असा विश्वास रेल कार्पोरेशन कसं व्यक्त करतंय असा प्रश्न आहे.

First published: July 6, 2018, 7:17 PM IST

ताज्या बातम्या