अयोध्येत राम मंदिर तर लखनौत मशीद बांधा-शिया वक्फ बोर्ड

अयोध्येत राम मंदिर तर लखनौत मशीद बांधा-शिया वक्फ बोर्ड

शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सैद वसीम रिझवी यांनी ही माहिती दिली आहे. या खटल्यातील सर्व पक्षधरांशी चर्चा केल्यानंतर हा प्रस्ताव तयार केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

  • Share this:

लखनौ,20 नोव्हेंबर: अयोध्येत वादग्रस्त जागी राम मंदिर बांधा आणि त्याजागी लखनौत आम्हाला एक मशीद बांधून द्या असा प्रस्ताव शिया वक्फ बोर्डाने आज मांडला आहे.  या प्रस्तावामुळे आता राम मंदिर-बाबरी मशीद वादाला नवीन वळण मिळण्याची चिन्हं आहेत.

एएनआयच्या वृत्तानुसार शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सैद वसीम रिझवी यांनी ही माहिती दिली आहे. या खटल्यातील सर्व पक्षधरांशी चर्चा केल्यानंतर हा प्रस्ताव तयार केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 5 डिसेंबरच्या आधी हा प्रस्ताव सुप्रीम कोर्टासमोर शिया वक्फ बोर्ड मांडणार आहे. या प्रस्तावामुळे शांतता  आणि बंधुभाव अबाधित राहील असं त्यांचं मत आहे.

काही दिवसांपूर्वी अयोध्येचा मसला कोर्टाबाहेर सोडवावा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये बऱ्याच चर्चा होत होत्या. या खटल्यावरची अंतिम सुनावणी 5 डिसेंंबरला सुरू होणार आहे. बाबरी मशीद-राम मंदिर हा देशातील अत्यंत जुना वाद असून सध्या तो न्यायप्रविष्ट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2017 01:19 PM IST

ताज्या बातम्या