LIVE : नोटबंदीचा निर्णय योग्य, लोकांचा माझ्या सरकारवरचा विश्वास वाढला : राष्ट्रपती

LIVE : नोटबंदीचा निर्णय योग्य, लोकांचा माझ्या सरकारवरचा विश्वास वाढला : राष्ट्रपती

आजपासून संसदेचं अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरूवात झाली.

  • Share this:

दिल्ली, 31 जानेवारी : आजपासून संसदेचं अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरूवात झाली. राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी अभिभाषण केलं. 2014 नंतरच्या सरकारने देशाला स्थैर्य प्राप्त करून दिलं. हे सरकार पारदर्शक असून देशाच्या सामाजिक आणि अर्थिक जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न केले. तसेच देशातील कोणताही नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही याची काळजी या सरकारने घेतल्याचे राष्ट्रपति रामनाथ कोविंद अभिभाषणात सांगितले.

मोदी सरकारच्या कार्यकाळातील हे शेवटचं अर्थसंकल्पिय अधिवेशन आहे. उद्या शेवटचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.

राष्ट्रपतिंच्या अभिभाषणातील मुद्दे :

भारत जगातली सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे.

नवीन योजना माझं सरकार वेगाने पूर्णत्वास आणत आहे.

जीएसटीमध्ये सुधारणेची प्रक्रिया सुरु केली आहे. जीएसटीमुळे व्यापार कऱणं अधिक सोपं झालं.

मेक इन इंडियाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत.

प्राप्तीकर देणाऱ्यांची संख्या वाढली. कर्ज बुडवगेरी कऱणाऱ्यांच्या वृत्तीला आळा बसला.

नोटाबंदीचा निर्णय हे योग्य पाऊल होतं. सरकारवरचा लोकांचा विश्वास वाढला. भ्रष्टाचार आणि काळा पैसा हा प्रामाणित नागरिकांवर अन्याय होता.

काळ्या पैशांविरोधात मोठा लढा दिला. नवीन नियम तयार केले गेलेगेल्या चार वर्षात माझ्या सरकारनं भ्रष्टाचाराविरोधात मोठी लढाई सुरु केली

देशाचे अन्नदाता अर्थात शेतकऱ्यांचं अभिनंदन

किमान आधारभूत मूल्याच्या दिडपट रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे

1 लाख 16 हजार ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरने जोडण्यात आलं आहे

डिजिटल इंडियाशी निगडीत योजनांना गती देण्याचा प्रयत्न

लष्करात महिलांना समसमान संधी देण्याचा प्रयत्न

दर वर्षी एक कोटी युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण

कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आली तरी शेतकऱ्यांनी त्यांचं कार्य सुरुच ठेवलं आहे

मुद्रा योजनेमुळे 15 कोटी नागरिकांना लाभ

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाचं असं घडत आहे की महिलांच्या सबलीकरणासाठी इतके प्रयत्न इतक्या योजना आणल्या जात आहेत

देशाचं भविष्य घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य संधी मिळणं महत्त्वाचं

103 केंद्रीय विद्यालय , आदिवसी विभागात निवासी विद्यालय बनवण्यासाठी प्रयत्न

भारत जगातला सर्वात युवा देश,15000 आय टी आय , पंतप्रधान कौशल केंद्र लवकरच निर्माण करणार

युवा शक्ती आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद

नैसर्गिक आपत्तींचा मुकाबला करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले

केंद्र सरकारच्या 100 वेबसाईटवरही दिव्यांग व्यक्तींसाठी आवश्यक बदल करण्यात आले आहेत

दिव्यांग व्यक्तींसाठी माझ्या सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत - राष्ट्रपती

प्रत्येक स्तरातल्या नागरिकांच्या आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण कऱण्याचा माझ्या सरकारचा प्रयत्न

प्रत्येकाच्या आयुष्यात आशेचा किरण आणण्याचा माझ्या सरकारचा प्रयत्न

गरीबांसाठी गृहनिर्माण योजनांना अभुतपूर्व गती देत माझ्या सरकारनं रेरा कायदा आणला

सरकारने 21 कोटी गरीबांना विमा सुरक्षा पुरवली.

नवीन वैद्यकिय रुग्णालय सुरु केली

कुपोषणापासून मुक्ती मिळवण्यासाठी विशेष अभियान सुरु केले

डायलिसिसवर नि:शुल्क सेवा उपलब्ध करुन दिली

गरीब , शेतकरी आणि वंचितांसाठी काम केलं

देशाला संपूर्ण स्वच्छ बनवण्याचा प्रयत्न

देशाला संपूर्ण स्वच्छ बनवण्याचा प्रयत्न

नवभारतात भ्रष्टाचाराला थारा नाही

सामाजिक न्यायाला आदर्श मानून पुढे वाटचाल करणार

First published: January 31, 2019, 11:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading