मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /BSNL कडून ग्राहकांना नववर्षाची भेट आता मिळवा 31 जानेवारीपर्यंत मोफत सिमकार्ड

BSNL कडून ग्राहकांना नववर्षाची भेट आता मिळवा 31 जानेवारीपर्यंत मोफत सिमकार्ड

या योजनेत नवीन कार्ड घेऊ इच्छिणारा किंवा पोर्ट होऊन आलेला ग्राहक दोघांनाही सिमकार्ड मोफत मिळेल.

या योजनेत नवीन कार्ड घेऊ इच्छिणारा किंवा पोर्ट होऊन आलेला ग्राहक दोघांनाही सिमकार्ड मोफत मिळेल.

या योजनेत नवीन कार्ड घेऊ इच्छिणारा किंवा पोर्ट होऊन आलेला ग्राहक दोघांनाही सिमकार्ड मोफत मिळेल.

    नवी दिल्ली, 2 जानेवारी : टेलिकॉम क्षेत्रातील विविध कंपन्या नववर्षानिमित्त वेगवेगळ्या योजना घेऊन येतात. त्यांच्याशी स्पर्धा करणाऱ्या सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडलाही (BSNL) टिकून राहण्यासाठी विविध योजना जाहीर कराव्या लागतात. बीएसएनएलनी आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षाची भेट म्हणून एका योजनेला मुदतवाढ दिली आहे. बीएसएनएल फॅमिली – Free SIM offer ही ऑफर आधीपासून सुरू होती. तिला मुदतवाढ देऊन ती 31 जानेवारी 2021 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. कंपनीने तमिळनाडू साठीच्या कंपनीच्या वेबसाईटवर ही योजना जाहीर केली आहे. म्हणजे आता 31 जानेवारीपर्यंत ग्राहकांना बीएसएनएलचं कार्ड मोफत मिळू शकेल.

    या योजनेत नवीन कार्ड घेऊ इच्छिणारा किंवा पोर्ट होऊन आलेला ग्राहक दोघांनाही सिमकार्ड मोफत मिळेल. सामान्यपणे बीएसएनएलचं कार्ड 20 रुपयांना मिळतं पण या योजनेत ते मोफत मिळेल. त्यामुळे ग्राहक या योजनेचा आनंद लुटू शकतील. नवीन वर्षाची ही भेट ग्राहकांना आवडेल अशी बीएसएनएलला आशा आहे.

    हे वाचा- TV, फ्रीज घ्यायचा विचार करत असाल तर आधी हे वाचा; होम अप्लायन्सेस होणार महाग

    पहिल्यांदा करावं लागेल 100 रुचं रिचार्ज

    ग्राहकांना नवीन योजना देण्याच्या हेतूने बीएसएनएलने 1 नोव्हेंबरला ही योजना सुरू केली होती ती 28 नोव्हेंबरपर्यंतच होती पुढे ती वाढवून 1 जानेवारीपर्यंत ठेवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा ती वाढवून 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. कुणीही ग्राहक या सिमकार्डसाठी अर्ज करू शकतं. एक अट मात्र आहे की हे सिम घेतल्यावर तुम्हाला त्यावर पहिलं 100 रुपयांचं फर्स्ट रिचार्ज कूपन (FRC) रिचार्ज करणं बंधनकारक आहे.

    हे वाचा- अर्थव्यवस्था सुधारण्याचे संकेत, या 5 क्षेत्रातील शेअर्स देतील चांगला रिटर्न

    दोन व्हाउचरमध्ये केला बदल

    बीएसएनएल तमिळनाडू सर्कलमध्ये 186 आणि 199 च्या व्हाउचरमध्ये बदल करण्यात आले असून ते 1 जानेवारी 2021 पासून लागू होणार आहेत. 186 रुपयांच्या व्हाउचरची किंमत आता 199 करण्यात आली असून ते 28 दिवसांऐवजी 30 दिवस वैध असेल. या व्हाउचरमधील इतर सगळ्या सुविधा तशाच मिळणार आहेत. 199 रुपयांचं टेरिफ व्हाउचर 201 रुपये केलं असून त्याची वैधता किंवा सुविधा वाढवलेल्या नाहीत.

    First published:
    top videos

      Tags: BSNL