• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • BSF Recruitment 2021: सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी पदभरती; लगेचच करा अप्लाय

BSF Recruitment 2021: सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी पदभरती; लगेचच करा अप्लाय

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2021 आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 27 जून : सीमा सुरक्षा दलात (BSF) विविध पदांसाठी पदभरती होणार आहे. BSF मार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एसआय (SI), एएसआय (ASI) ऑपरेशन थिएटर टेक्निशियन (Operation Theatre technician), एएसआय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (ASI Laboratory technician), सीटी (CT), एचसी (HC), हवालदार (Constable), सहाय्यक विमान मॅकेनिक (Assistant Aircraft Mechanic),सहाय्यक रेडिओ मेकॅनिक (Assistant Radio mechanic). या पदांकरता अर्ज मागवण्यात येत आहेत. सीमा सुरक्षा दल भरती साठी एकूण 175 रिक्त जागा आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2021 आहे. या आहेत जागा सीमा सुरक्षा दलात एसआय (SI), एएसआय (ASI) ऑपरेशन थिएटर टेक्निशियन (Operation Theatre technician), एएसआय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (ASI Laboratory technician), सीटी (CT), एचसी (HC), हवालदार (Constable), सहाय्यक विमान मॅकेनिक (Assistant Aircraft Mechanic),सहाय्यक रेडिओ मेकॅनिक (Assistant Radio mechanic). या पदांच्या एकूण 175 पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. हे वाचा - विद्यार्थ्यांनो, 11वी प्रवेशासाठी CET देताय? मग अशा पद्धतीनं करा Smart Study शैक्षणिक पात्रता वरील सर्व पदांसाठी उमेदवारांनी दहावी आणि बारावी पास असणं आवश्यक आहे. त्यानंतरच शिक्षण पदानुसार असणं आवश्यक आहे. जाहिरातीत शिक्षासंबंधीची संपूर्ण माहिती देण्यात अली आहे. किती मिळेल पगार एसआय (SI), एएसआय (ASI) ऑपरेशन थिएटर टेक्निशियन (Operation Theatre technician), एएसआय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (ASI Laboratory technician), सीटी (CT), एचसी (HC), सहाय्यक विमान मॅकेनिक (Assistant Aircraft Mechanic),सहाय्यक रेडिओ मेकॅनिक (Assistant Radio mechanic) या पदांसाठी सातव्या वेतन आयोगानुसार 29,200 - 92,300 रुपये प्रति महिना इतका पगार मिळणार आहे. हवालदार (Constable) या पदासाठी सातव्या वेतन आयोगानुसार 21,700 - 69,100 रुपये प्रति महिना इतका पगार मिळणार आहे. असं करा अप्लाय या पदांसाठी अर्ज करण्यासाठी https://bsf.gov.in/Home या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. या पदभरतीची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आणि नोटिफिकेशन बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: