Home /News /news /

बीएसएफच्या जवानांनी 12 पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातलं !

बीएसएफच्या जवानांनी 12 पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातलं !

भारताच्या सीमा सुरक्षा दलाने अर्थात बीएसएफने पाकिस्तानच्या १२ पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून त्यांच्या चार चौक्याही उद्ध्वस्त करण्यात आल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बीएसएफने ही धडाकेबाज कारवाई केलीय.

पुढे वाचा ...
0 4जानेवारी, नवी दिल्ली : भारताच्या सीमा सुरक्षा दलाने अर्थात बीएसएफने पाकिस्तानच्या १२ पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून त्यांच्या चार चौक्याही उद्ध्वस्त करण्यात आल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बीएसएफने ही धडाकेबाज कारवाई केलीय. जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं काल शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला होता. त्यात बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल आर पी हजरा शहीद झाले होते. वाढदिवसाच्याच दिवशी त्यांना प्राण गमवावा लागला होता. त्यांच्या मृत्यूचा बदला बीएसएफ जवानांनी २४ तासांच्या आत घेतला आहे. बीएसएफनं धडक कारवाईत पाकिस्तानी सैन्याच्या गाड्या नष्ट केल्या असून पाकिस्तानी चौक्यांचंही मोठं नुकसान झाल्याचं बीएसएफचे महानिरीक्षक रामावतार यांनी सांगितलं.  
First published:

Tags: Bsf, Pak killed, पाक सैनिक ठार, बीएसएफ

पुढील बातम्या