भावाने पाठवला आत्महत्येचा 'PHOTO' बहिणीला वाटली मस्करी, सकाळी दरवाजा उघडताच...!

भावाने पाठवला आत्महत्येचा 'PHOTO' बहिणीला वाटली मस्करी, सकाळी दरवाजा उघडताच...!

सगळ्यात धक्कादायक म्हणजे या तरुणाने मृत्यू होण्यापूर्वीचा फोटो आपल्या बहिणीला व्हॉट्सअॅपवर पाठवला.

  • Share this:

बिलासपूर(छत्तीसगड)20 सप्टेंबर : नोकरी न मिळाल्यामुळे त्रस्त झालेल्या एका तरुणाने घरातच गळफास लावून आत्महत्या केली. सगळ्यात धक्कादायक म्हणजे या तरुणाने मृत्यू होण्यापूर्वीचा फोटो आपल्या बहिणीला व्हॉट्सअॅपवर पाठवला. आपल्या शेवटच्या मेसेजमध्ये त्याने बहिणीला लिहिलं की, 'तू शिक्षिका झालीस मी आज मरू नाही शकलो गं'. हा मेसेज टाकल्यानंतर तरुणाने आत्महत्या केली आहे. या हृदय हेलावणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हा धक्कादायक प्रकार बिलासपूर गंगानगर फेसमध्ये घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रेश असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याला नोकरी नसल्यामुळे तो चिंतेत होता. मंगळवारी सकाळी जेव्हा कुटुंबीय चंद्रेशला उठवण्यासाठी गेले तेव्हा त्याने बराच वेळ दरवाजा उघडला नाही. त्याने कोणाच्याही हाकेला आवाज दिला नाही. अखेर धक्का मारून दरवाजा तोडण्यात आला तेव्हा चंद्रेशचा मृतदेह आढळला.

इतर बातम्या - 21 वर्षीय तरुणीला चावला साप, मृत घोषित केल्यानंतर स्मशानात युवती उठून बसली!

बर्‍याच दिवसांपासून होता अस्वस्थ

असे सांगितलं जात आहे की, चंद्रेश नोकरी न मिळाल्याने खूप नाराज होता. कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना सांगितलं की, घरात चंद्रेश सर्वात धाकटा होता. त्याचे पिता लोमन हे पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त लिपिक आहेत. त्याची आई जमुना गृहिणी असून बहीण अंकिता ही शिक्षिका आहे. प्रमोद हा मृताचा मोठा भाऊ असून तो बेंगळुरू (बेंगलुरू) मध्ये सॉफ्टवेअर अभियंता आहे. पण अद्याप त्याला नोकरी मिळाली नव्हती. यामुळे तो बराच काळ अस्वस्थ होता.

इतर बातम्या - तुम्ही कधीही पाहिले नसतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने 'PHOTOS'

बहिणीला केला शेवटचा मेसेज...

चंद्रेशने आत्महत्या करण्याआधी त्याच्या बहिण अंकिताला व्हॉट्सअॅपवर मेसेज केला होता. यामध्ये त्याने आत्महत्येसाठी पंख्याला दोर बांधला होता. 'तू शिक्षिका झालीस मी आज मरू नाही शकलो गं'. असा मेसेज लिहला होता. अंकिताला वाटलं की भाऊ मस्ती करत आहे. त्यामुळे तिने मेसेजकडे लक्ष दिलं नाही. पण त्यानंतर सकाळी चंद्रेशने आत्महत्या केली असल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

चंद्रेशने आत्महत्या केल्याचं कुटुंबीयांच्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2019 07:46 PM IST

ताज्या बातम्या