चपाती गोल आली नाही म्हणून भाऊ संतापला, बहिणीच्या डोक्यात झाडल्या गोळ्या!

तरुणीचा नुकताच विवाह झाला होता. पण ती कुटुंबीयांना भेटण्यासाठी माहेरी आली होती. त्यावेळी ती घरात स्वयंपाक करत होती.

News18 Lokmat | Updated On: Sep 3, 2019 12:19 PM IST

चपाती गोल आली नाही म्हणून भाऊ संतापला, बहिणीच्या डोक्यात झाडल्या गोळ्या!

उत्तर प्रदेश, 03 सप्टेंबर : चपात्या करताना त्यांचा आकार गोल नाही आला म्हणून प्रत्येकीनं आईचा ओरडा खाल्ला असेल. पण चपत्यांचा गोल आकार आला नाही म्हणून युवतीला गोळी घालून मारून टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका भावाने बहिणीला गोळी घातली असल्याचं सांगण्यात येत आहे. सदैव बहिणीचं रक्षण करणाऱ्या भावाने अशा शुल्लक कारणावरून बहिणीची हत्या केल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचा नुकताच विवाह झाला होता. पण ती कुटुंबीयांना भेटण्यासाठी माहेरी आली होती. त्यावेळी ती घरात स्वयंपाक करत होती. पण चपात्या करताना चपात्यांचा आकार गोल आला नाही. त्यामुळे रागात आलेल्या चुलत भावाने तिच्य़ावर गोळ्या झाडल्या. सुमन असं मृत्यू झालेल्या बहिणीचं नाव आहे तर सोनू असं आरोपी चुलत भावाचं नाव आहे.

उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. काही वर्षांआधी मृत सुमनच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. सुमन तिच्या चुलत भावाला सख्या भावासारखं मानत होती. काही दिवसांआधी सुमनचा विवाह झाला होता. ज्यादिवशी ही घटना घडली तेव्हा सोनू घरी दारू पिऊन आला होता. त्यानंतर त्याने घरात भांडण करण्यास सुरुवात केली आणि यातच सुमनला त्याने गोळी घातल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

इतर बातम्या - उरणच्या ONGC प्लांटमध्ये अग्नितांडव, CISFच्या फायर विंगचे 3 जवान शहीद

घटनेच्या वेळी सोनू दारूच्या नशेत होता. किचनमध्ये जेवन बनवत असलेल्या सुमनने चपात्या गोल नाही बनवल्या त्य़ामुळे त्याने तिच्याशी वाद घातला. यानंतर वडिलांच्या बंदुकीने त्याने सुमनला डोक्यात गोळी घालून तिला ठार केलं. ही घटना घडवून आणल्यानंतर आरोपी भाऊ घटनास्थळावरून फरार झाला. याबद्दल गावकऱ्यांना खबर लागताच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर सोनू सुमनची अशा प्रकारे हत्या करेल यावर गावकऱ्यांचा विश्वास बसत नाही आहे.

Loading...

इतर बातम्या - आजही पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर, 'हे' आहेत तुमच्या शहरातले दर

या प्रकरणात मोहम्मदीचे इन्स्पेक्टर संजय त्यागी यांनी सांगितलं की, बहिणीची हत्या केल्यानंतर आरोपी सोनू हा फरार झाला आहे. त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे. दरम्यान, अशा प्रकारे जीव गमावल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे तर पोलीस आता संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत आहेत.

जगातील आक्रमक हेलिकॉप्टर भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात, पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2019 12:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...