नागपूरच्या डॉ. समीर अरबट यांनी ब्रॉन्कोस्कोपी प्रक्रिया सोपी करण्यासाठी सेफ्टी बॉक्स तयार केला आहे. यामुळे बाधित रुग्णाकडून उपचार करणाऱ्यांना होणारा संक्रमणाचा धोका कमी करता येतो.
नागपूर, 03 एप्रिल : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे काम करत आहेत. मात्र, कोरोना संक्रमीत व्यक्तीकडून डॉक्टर किंवा इतर कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याची भीती अधिक असते. यावर नागपूरच्या डॉ. समीर अरबट यांनी ब्रॉन्कोस्कोपी प्रक्रिया सोपी करण्यासाठी सेफ्टी बॉक्स तयार केला आहे. यामुळे बाधित रुग्णाकडून उपचार करणाऱ्यांना होणारा संक्रमणाचा धोका कमी करता येतो.
कोरोना बाधित रुग्णाच्या शिंकेमुळे किंवा खोकल्यामुळे संक्रमणाचा धोका अधिक असतो. हा धोका कमी करण्यासाठी सेफ्टी बॉक्समध्ये ऑपरेटर अपरेचर लावण्यात आलं आहे. याला प्लास्टिक शीट व्हॉल्वने कव्हर केलं आहे. याला उघडता आणि बंद करता येतं. यात एक छिद्र सुद्धा आहे. यामुळं कोरोना बाधित रुग्णाची श्वशन प्रकिया थांबली तरी ते काम करते.
युरोपियन देशातील 'इटेलीयन सोसायटी ऑफ हॉस्पिटल पल्मोनोलॉजी' मध्ये या सिक्युरिटी बॉक्सचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार असल्याचं डॉ. समीर अरबट यांनी सांगितलं आहे. त्यामुळे हे जर सगळ्यांच्या वापरासाठी खुलं झालं तर त्याचा मोठा फायदा होईल असं समीर यांचं म्हणणं आहे.