Home /News /news /

80 वर्षांच्या वृद्ध महिलेचा 35 वर्षांच्या तरुणावर जडला जीव, शारीरिक संबंधानंतर गेले होते लग्न करायला,पण...!

80 वर्षांच्या वृद्ध महिलेचा 35 वर्षांच्या तरुणावर जडला जीव, शारीरिक संबंधानंतर गेले होते लग्न करायला,पण...!

एका 80 वर्षांच्या वृद्ध महिलेचं 35 वर्षांच्या तरुणावर जीव जडला आहे. मोहम्मद अहमद असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याची गर्लफ्रेंड आइरिस जोन्सही 80 वर्षांची वृद्ध महिला आहे.

    मुंबई, 02 फेब्रुवारी :  'प्रेम हे आंधळं असतं' असं म्हटलं जातं. आता तर फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे आणि तरुण-तरुणींना 'व्हॅलेन्टाईन्स डे'चे वेध लागले आहे. पण अशी एक घटना समोर आली आहे जी वाचून तुम्ही थक्क व्हाल. एका 80 वर्षांच्या वृद्ध महिलेचं 35 वर्षांच्या तरुणावर जीव जडला आहे. मोहम्मद अहमद असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याची गर्लफ्रेंड आइरिस जोन्सही 80 वर्षांची वृद्ध महिला आहे. या दोघांच्या लव्ह स्टोरीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. इजिप्तमध्ये राहणाऱ्या मोहम्मद अहमदने अलीकडे ब्रिटनमध्ये पेंशनधारक असलेल्या 80 वर्षांच्या महिलेसोबत रिलेशन असल्याचं मान्य केलं आहे. एवढंच नाहीतर लवकरच दोघं लग्नही करणार आहे. मोहम्मद अहमदने रिलेशनशिपबद्दल खुलासा केल्यानंतर अनेक जण या कपलबद्दल उलटसुलट चर्चा करत आहे. काही जण तर या दोघांची खिल्ली उडवत आहे. पण लोकं काही म्हणत असले तरी मोहम्मद आणि त्याची गर्लफ्रेंड एकमेकांना डेट करत आहे. संडे मिररने दिलेल्या वृत्तानुसार, वृद्ध महिला आइरिस ही मोहम्मदच्या आईपेक्षा 20 वर्षांनी मोठी आहे. पण, एखाद्या व्यक्तीवर प्रेम जडलं तर त्याला वयाचं बंधन नसतं, असं मोहम्मदचं म्हणणं आहे. अशी सुरू झाली लव्हस्टोरी? या दोघांची भेट ही फेसबुकवर झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढत गेली. फेसबुकवर सुरू असलेली चॅट आधी मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात रुपांतरीत झाली. परंतु, सोशल मीडियावर काही जणांनी या वृद्ध महिलेकडून पैसे लुटण्यासाठी हा खटाटोप असल्याचा आरोप केला. मात्र, ब्रिटन सरकार आइरिसला फक्त 200 पाऊंड म्हणजे 19000 रुपये पेंशन देते. या प्रेमाच्या नात्यावर आइरिस यांनीही खुलासा केला आहे. मोहम्मदवर आपण प्रेम करत असल्याचं कबूल केलंय. तसंच गेल्या 40 वर्षांमध्ये सेक्सचा विचार सुद्धा केला नाही. आता मोहम्मद आयुष्यात आल्यामुळे लवकरच लग्न करणार असल्याचं आइरिस यांनी सांगितलं. एवढंच नाहीतर, शारिरिक संबंध प्रस्तापित झाल्यानंतर दोघं लग्न करण्यासाठी कोर्टातही गेले होते. पण, काही कागदपत्र कमी पडल्यामुळे प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. आता दोघेही लग्न करण्यासाठी तयार झाले असून आइरिस आता इजिप्तला  पूर्ण कागदपत्र घेऊन जाणार आहे. त्यानंतर दोघं लग्नबेडीत अडकणार आहे. आइरिस यांनी 40 वर्षांपूर्वी आपल्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला होता.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या