अबब! 21 बाळांची आई आहे ही महिला, आता पुन्हा झाली गरोदर

युट्यूबवर प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण 22व्या वेळी गरोदर असल्याचं या महिलेने सांगितलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 21, 2019 01:56 PM IST

अबब! 21 बाळांची आई आहे ही महिला, आता पुन्हा झाली गरोदर

ब्रिटन, 21 ऑक्टोबर : सुपरमॉम नावाने चर्चेत असलेली एक महिला आता पुन्हा गरोदर झाली असून ती आता 22व्या बाळाला जन्म देणार आहे. ही महिला ब्रिटनला राहणारी आहे. 22 व्या वेळी ही महिला गर्भवती असल्यामुळे सुपरमॉम अशा नावाने त्या चर्चेत  आहेत. बरं इतकंच नाही तर त्या अगदी तंदुरूस्त आहेत. 44 वर्षांच्या सू रॅडफॉर्ड आणि 48 वर्षांचे त्यांचे पती नोएल यांच्या कुटुंबाला ब्रिटनचं सगळ्यात मोठं कुटुंब म्हणून ओळखलं जातं.

युट्यूबवर प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण 22व्या वेळी गरोदर असल्याचं या महिलेने सांगितलं आहे. रॅडफोर्ड यांचं कुटुंब ब्रिटनच्या मोरेकॅम्बेमध्ये राहतं. मागच्या वेळी सूने 2018मध्ये शेवटच्या बाळाला जन्म दिला होता. आता 2019मध्ये त्या पुन्हा गर्भवती आहेत. सूने यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 आठवड्यांपासून त्या गर्भवती आहेत आणि सगळे अपक्षेत आहेत की यावेळी त्यांना मुलगा होईल.

सू यांनी म्हटलं की जर यावेळी त्यांना मुलगा झाला तर त्यांना एकूण 11 मुलं आणि 11 मुली असतील. ब्रिटनच्या या सगळ्यात मोठ्या कुटुंबाचा खर्च हा पारिवारिक बेकरी बिजनेसच्या माध्यमातून चालतो. 10 खोल्यांच्या घरात हे सगळे जण राहतात. 9व्या मुलाच्या गरोदरपणानंतर नोएल यांनी नसबंदी केली होती पण त्यानंतर आणखी एका मुलाच्या इच्छेसाठी त्यांनी पुन्हा एकदा सर्जरी केली.

इतर बातम्या - मतदान केंद्रावरच भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, दोन जण गंभीर

मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या जोडप्याला एक मुलगी झाली. तर या घरातील सगळ्यात मोठी मुलं क्रिस आणि सोफी हे कुटुंबापासून वेगळे राहतात. बाकी सगळे जण एकत्र राहतात. सू आणि नोएल आजी-आजोबादेखील झाले आहेत. सोफी 3 मुलांची आई आहे. या संपूर्ण कुटुंबाची सध्या जगभर चर्चा आहे. खरंतर जनजागृतीच्या नावाने गप्पा मारणारं आरोग्य विभाग आणि महिला बालकल्याण विभागाचं पितळ महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातही उघडं पडलं होतं.

Loading...

भटक्या पालावर राहणाऱ्या एक महिला 11 मुलांना जन्म दिल्यानंतर 21 व्या वेळी गर्भवती राहिल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं होतं. यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडली होती. या महिलेचं समुपदेशन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं होतं. या महिलेला आतापर्यंत 9 मुली आणि 2 मुले अशी आपत्य असून पाच जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं.

या प्रकारामुळे 'हम दो हमारे अकरा, आईच्या तब्यतीला खतरा' असं म्हणायची वेळ आली होती. बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातील केसपुरी कॅम्प परिसरात पाल ठोकून राहणाऱ्या राजाभाऊ खरात यांच्या पत्नी लंकाबाई राजेभाऊ खरात या 38 वर्षीय महिलेच्या बाबतीत हे घडलं. खरात कुटूंब हे मुळचं टाकरवण इथले रहिवासी आहेत.

इतर बातम्या - शरद पवारांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण, महिला आयोगाच्या भूमिकेवर घेतली शंका

गावात हाताला काम मिळत नाही म्हणून रोजगाराचं साधन नसल्याने केसापुरी कॅम्प इथे पाल ठोकून राहतात. याच ठिकाणी राजेभाऊ खरात हे गीत गायन करून उदरनिर्वाह करतात. लंकाबाई या भंगार वेचण्याचं काम करतात. अशिक्षित लंकाबाई यांची आत्तापर्यंत 21 बाळंतपणं झाली असं त्याचं म्हणणं. तर शासकीय नोंदणीनुसार त्यांची 17 बाळंतपणं झाली असल्याची माहिती आहे. त्यांच्या काही बाळंपणाची नोंद झाली नसावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

सध्या लंकाबाई यांना 9 मुली आणि 2 मुले आहेत तर 5 मुलांचा जन्मानंतर विविध कारणांमुळे मृत्यू झाला. लंकाबाई 21 व्या वेळी पुन्हा गरोदर राहिल्या. यामुळे कुटुंब कल्याणच्या नावाने जनजागृती करणारे गेले कुठे? हा खरा प्रश्न निर्माण होतो. या प्रकारामुळे बीडच्या आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली होती.

इतर बातम्या - LIVE UPDATE : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं बजावला मतदानाचा अधिकार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2019 01:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...