मुंबई, 12 ऑगस्ट : लग्नात (Wedding) कोण कधी काय करेल याचा नेम नाही. मस्तीमस्तीत कधी कधी काहीतरी शॉकिंगही घडतं (Wedding video) . असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात नवरदेवाच्या मैत्रिणी त्याच्यासोबत असं काही करतात की ते पाहून नवरीला धक्काच बसतो.
एका लग्नाच्या हळदीचा व्हिडीओ (Haldi video) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हळदी समारंभ म्हणजे लग्नातील फेव्हरेट असा समारंभ असतो. हळद म्हणजे मनसोक्त डान्स, मजा, मस्ती. पण व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत नवरदेवाच्या मैत्रिणींची जरा जास्तच मस्ती केली आहे, जे पाहून नवरी शॉक झाली आहे.
View this post on Instagram
व्हिडीओत पाहू शकता अगदी उत्साहात, जोशात हळद सुरू आहे. काही तरुणी नवरदेवाजवळ येतात आणि त्याला हळद लावता लावता अक्षरशः तुटून पडतात. त्यानंतर नवऱ्याशेजारी बसलेल्या नवरीकडे जरा एकदा पाहा. तिची प्रतिक्रिया पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
हे वाचा - नवरीचे दागिने गायब, मेकअपही बिघडला; लग्नादिवशीच नवऱ्याने मग...; पाहा VIDEO
नवरदेवाच्या मैत्रिणी जोमात आणि नवरी कोमात अशीच ही परिस्थिती आहे. नवरदेवाला तरुणी अशा पद्धतीने हळद लावत आहे, ते पाहून नवरीला मोठा झटका बसल्यासारखंच दिसतं आहे. ती हे सर्व पाहतच राहते. नेमकं हे चाललं काय आहे, तिला काहीच समजत नाही आहे. एकतर ही नवरी खूप घाबरली आहे. किंवा तिला तरुणींचं हे कृत्य पचनी काही पडलेलं नाही. त्यामुळे ती स्तब्ध झाली आहे.
हे वाचा - नवरदेव ठोंब्यासारखा बसून राहिला, अखेर पंडितनेच...; लग्नाचा VIDEO पाहून व्हाल शॉक
mahesh_kolhatkar_photograph इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Funny video, Viral, Viral videos, Wedding, Wedding video