मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /भरमंडपात नवरा-नवरीने हातात घेतली तलवार आणि...; कधीच पाहिला नसेल असा Wedding video

भरमंडपात नवरा-नवरीने हातात घेतली तलवार आणि...; कधीच पाहिला नसेल असा Wedding video

लग्नाचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही डोक्याला हात लावाल.

लग्नाचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही डोक्याला हात लावाल.

लग्नाचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही डोक्याला हात लावाल.

मुंबई, 09 सप्टेंबर : प्रत्येक गाव, राज्य, समाज, धर्म, जातीनुसार लग्नाच्या (Wedding Video) प्रथा-परंपराही वेगवेगळ्या असतात. पण सध्या बहुतेक लग्नांमध्ये इतर लग्नाच्या प्रथा किंवा परंपराचाही समावेश केला जातो. त्यापैकीच एक म्हणजे लग्नात केक कापणं (Wedding cake). तसं केक कटिंग ही आपल्या भारतीय विवाहातील परंपरा नाही. पण आता लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी बहुतेक लग्नात केक कापला जातो. नवरा-नवरी (Bride Groom Video)  केक कापताना दिसतात. अशाच लग्नातील एका केक कटिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

लग्नातील केक कटिंगचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे विचित्र केक आणि तो कापण्याची पद्धत. तसं लग्नाचा केक थोडा हटकेच असतो. म्हणजे तो खास बनवून घेतला जातो. पण लग्नाचा हा केक आणि तो ज्याप्रकारे कापला जात आहे, तो पाहून तर तुम्ही तोंडात बोटंच घालाल.

व्हिडीओत पाहू शकता दहीहंडीप्रमाणे केक लटकवण्यात आला आहे आणि नवरा-नवरी हातात तलवार धरून आपला वेडिंग केक कापण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे वाचा -  'घरवाली बाहरवाली'चा खेळ संपला! बायकोने नवऱ्याला रंगेहाथ पकडलं आणि...; पाहा VIDEO

सामान्यपणे छोट्याशा सुरीने केक कापला जातो. पण इथं तर लग्नात तलवारीनेच केल कापला जातो आहे. तरीसुद्धा नवरा-नवरीला तो केक काही कापता येत नाही आहे. कारण तो लटकवलेला आहे आणि नीट कापता येत नाही. दोघंही खूप प्रयत्न करतात, एकमेकांची अवस्था पाहून एकमेकांकडे पाहत हसतात. शेवटी नवरी वैतागते आणि नवऱ्याचा हात सोडून देते. नवरा केक कापत राहतो.

हे वाचा -  VIDEO- 'करीना कपूरसारखी सावत्र आई हवी, ढसाढसा रडत चिमुकलीचा बाबांकडे भलताच हट्ट

नवरा-नवरीची केक कापताना झालेली अवस्था पाहून पाहुण्यांनी मात्र त्यांची चांगलीच मजा घेतली. सर्वजण त्यांना पाहून हसत होते. The Chopra Events इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर मजेशीर कमेंट येत आहेत.

First published:

Tags: Bridegroom, Viral, Viral videos, Wedding video