BREAKING ठाणे पालिकेकडूनही लॉकडाउनची घोषणा, 'या' तारखेपर्यंत संपूर्णपणे बंद!

BREAKING ठाणे पालिकेकडूनही लॉकडाउनची घोषणा, 'या' तारखेपर्यंत संपूर्णपणे बंद!

तर महाराष्ट्रातही लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. सध्या जे नियम आहेत त्यात फारसा बदल करण्यात आलेला नाही.

  • Share this:

ठाणे, 29 जून : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईसह ठाण्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. ठाणे महापालिकेनंही संपूर्ण ठाणे जिल्ह्यात

1 ते 11 जुलैपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे.

ठाणे महापालिकेच्या हद्दीत 11 जुलैपर्यंत लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवा म्हणून मेडिकल आणि दुध डेअरी सुरू राहणार आहे.

तर महाराष्ट्रातही लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. सध्या जे नियम आहेत त्यात फारसा बदल करण्यात आलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारच्या संवादात याचे संकेत दिले होते.

MMRDA परिसरात केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना तसंच कार्यालयात जाणाऱ्यांनाच दूरचा प्रवास करता येणार आहे. शॉपिंगसाठी जवळच्या मार्केटपर्यंत जाता येईल, दूर जाता येणार नाही.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या काही थांबवण्याचं नाव घेत नाही आहे. दर दिवशी कोरोनाची रेकॉर्ड ब्रेक आकडेवारी समोर येत आहे. देशात कोरोनाची एकूण संख्या 5 लाख 48 हजार 318 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 19,459 नवीन रुग्ण आढळले आणि 380 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. सलग दुसर्‍या दिवशी कोरोनाची जवळपास 20 हजार प्रकरणं समोर आली आहेत.

संपादन - सचिन साळवे

First published: June 29, 2020, 3:47 PM IST
Tags: thane

ताज्या बातम्या