Home /News /news /

फरार नीरव मोदीला सगळ्यात मोठा धक्का, सर्व मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश

फरार नीरव मोदीला सगळ्यात मोठा धक्का, सर्व मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश

नीरव मोदीवर मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत खटला चालवला जात होता.

    नवी दिल्ली, 08 जून : पंजाब नॅशनल बँके (PNB) च्या 13 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी फरार हिरा व्यापारी नीरव मोदी (Nirav Modi) ला कोर्टाने मोठा झटका दिला आहे. त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. नीरव मोदीवर मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत खटला चालवला जात होता. त्यावर आज पीएमएलए कोर्टाने नीरव मोदीची सर्व मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर आता नीरवच्या सर्व मालमत्तेवर भारत सरकारचा (Indian Government) अधिकार असणार आहे. राजावाडी रुग्णालयातून पॉझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह गायब, किरीट सोमय्यांचा आरोप कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, नीरव मोदीला फरार घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे नव्या फरार आर्थिक गुन्हेगार कायदा (FEOA) नुसार सर्व मालमत्ता जप्त करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे कोर्टानं फरार नीरव मोदीची संपत्तीदेखील जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. याआधीही ईडीने नीरव मोदीची संपत्ती जप्त करण्याची कारवाई केली होती. यावेळी मार्च 2020 मध्ये झालेल्या त्याच्या मालमत्तीच्या लिलावातून 51 कोटी रुपये मिळाले होते. ही मालमत्ता ईडीने जप्त केली होती. सूट मिळताच पुण्यातल्या 'या' भागात मोठा फटका, 12 रुग्णांवरून आकडा थेट 372 वर नीरव मोदीच्या लिलाव केलेल्या संपत्तीमध्ये रॉल्स रॉयस कार, एमएफ हुसेन आणि अमृता शेर-गिल यांची पेंटिंग्स आणि डिझाइनर हँडबॅग्जचा समावेश होता. यापूर्वी, सैफरनआर्टने मार्च 2019 मध्ये नीरव मोदीच्या मालकीच्या काही कलाकृतींचाही लिलाव करण्यात आला होता, त्यातून 55 कोटी रुपये मिळाले होते. नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँक (PNB) ची 14,000 कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. नीरव मोदी हा देशातून फरार असून सध्या लंडनच्या तुरूंगात आहे. मुंबईत धक्कादायक प्रकार, डॉक्टर फिरकले नाहीत म्हणून 16 तास मृतदेह घरात पडून संपादन - रेणुका धायबर
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Pnb bank fraud

    पुढील बातम्या