Home /News /news /

Breaking: भाजप नेते निलेश राणे यांना कोरोनाची लागण

Breaking: भाजप नेते निलेश राणे यांना कोरोनाची लागण

कोरोनाच्या संसर्गाने राजकीय नेत्यांपासून ते अनेक दिग्गजांना वेढलं आहे. मोठ्या पक्षातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

    सिंधुदूर्ग, 16 ऑगस्ट : राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनाच्या संसर्गाने राजकीय नेत्यांपासून ते अनेक दिग्गजांना वेढलं आहे. मोठ्या पक्षातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशात भाजपचे नेते निलेश राणे यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. यासंबंधी निलेश राणे यांनी ट्वीटकरुन माहिती दिली आहे. प्राथमिक लक्षण दिसली असता मी कोरोनाची चाचणी केली आणि माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने निलेश राणे हे सेल्फ क्वारंटाईन झाले आहेत. तर पुढील उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. पवार कुटुंबात पुन्हा All Is Well, असा निवळला पार्थवरील वाद निलेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, 'कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी.' राज्यात पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज दरम्यान, राज्यात अनेक दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. भाजपमध्ये अमित शहांपासून ते अनेक आमदार आणि खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांची पत्नी मेधा सोमय्यादेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहे. त्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या