मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

''ठाकरे सरकार इतके घाबरलं...'', कराडमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया

''ठाकरे सरकार इतके घाबरलं...'', कराडमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया

Kirit Somaiya Reaction:  आज सोमय्या कोल्हापूरला भेट देणार होते. पहाटे 4.30 च्या सुमारास पोलिसांनी कराडमध्ये ताब्यात घेतलं.

Kirit Somaiya Reaction: आज सोमय्या कोल्हापूरला भेट देणार होते. पहाटे 4.30 च्या सुमारास पोलिसांनी कराडमध्ये ताब्यात घेतलं.

Kirit Somaiya Reaction: आज सोमय्या कोल्हापूरला भेट देणार होते. पहाटे 4.30 च्या सुमारास पोलिसांनी कराडमध्ये ताब्यात घेतलं.

  • Published by:  Pooja Vichare
सातारा, 20 सप्टेंबर: भाजप नेते (BJP Leader) किरीट सोमय्या (kirit somaiya) राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केलेत. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांना साताऱ्यातील (Satara) कराड रेल्वे स्थानकावरुन पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं. आज सोमय्या कोल्हापूरला भेट देणार होते. पहाटे 4.30 च्या सुमारास पोलिसांनी कराडमध्ये ताब्यात घेतलं. कोल्हापूर आणि सातारा पोलिसांनी (Kolhapur and Satara Police)ही संयुक्तरित्या कारवाई केली आहे. दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर किरीट सोमय्या यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे सरकार इतकं घाबरलं आहे की मला कोल्हापूरला जाण्यास बंदी घातली अशी प्रतिक्रिया सोमय्यांनी दिली आहे. तसंच कोल्हापुराला जाऊन मला आंबेमातेचे दर्शन करायचं आहे. आज मी कराडमध्ये उतरत आहे. पण पुढच्या दोन दिवसांत मी कोल्हापुराला जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान किरीट सोमय्या थोड्याच वेळात पत्रकार परिषदे घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा बाहेर काढणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. नेमका हा घोटाळा काय असेल याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देणार आहेत. किरीट सोमय्या यांना या संदर्भात कोल्हापूरमध्ये जाऊन पाहणी करायची होती. मात्र रोखल्यामुळे ते कराडमध्येच पत्रकार परिषदेत या संदर्भातली माहिती देणार असल्याचं समजतंय. किरीट सोमय्यांनी Tweet करुन दिली माहिती पोलिसांनी मला निषेधाच्या आदेशान्वये कराड येथे थांबवले. मी आज सकाळी 9 वाजता कराड सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणार. दुसरीकडे काल रात्री सोमय्या कोल्हापूरला महालक्ष्मी एक्स्प्रेसने ( mahalaxmi express) रवाना झाले. त्यानंतर रात्री सव्वाबाराच्या सुमारास महालक्ष्मी एक्सप्रेस पुणे रेल्वे स्थानकावर दाखल झाली. यावेळी पुणे रेल्वे स्थानकावर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी किरीट सोमय्या यांचं अभिनंदन करत जोरजोरात घोषणाबाजी केली. हेही वाचा- रात्रभर नाट्य, कऱ्हाडमध्ये ताब्यात घेतलेले सोमय्या सध्या शासकीय विश्रामगृहात किरीट सोमय्या यांना कोल्हापूरमध्ये जिल्हाबंदीची नोटीस आम्ही दिली. आम्ही त्यांना जिल्ह्यात न येण्याची विनंती केली. त्यांनी कराड मध्ये उतरावे अशी आम्ही विनंती केली, असं कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे यांनी सांगितलं. हेही वाचा- Weather Forecast: राज्यात मान्सूनचा जोर वाढणार, आज मुंबईसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा  तिरुपती काकडे यांनी केलेल्या विनंतीनुसार, पहाटे पावणेपाच वााजता भाजप नेते माजी खासदार सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेसमधून (Mahalakshmi Express) कराडला उतरले. सध्या किरीट सोमय्या शासकीय विश्रामगृहात थांबले.
First published:

Tags: BJP, Kirit Somaiya, NCP

पुढील बातम्या