VIDEO: शहापूरजवळील वन क्षेत्राला भीषण आग, मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा ठप्प

VIDEO: शहापूरजवळील वन क्षेत्राला भीषण आग, मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा ठप्प

Fire at Khardi- Kasara Railway Line: खर्डी ते कसारा रेल्वे लाईन दरम्यान जंगल क्षेत्राला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:

हापूर, 03 मार्च: खर्डी ते कसारा रेल्वे लाईन दरम्यान जंगल क्षेत्राला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूने कित्येक किलोमीटरपर्यंत ही आग पसरली आहे. त्यामुळे मोठी नैसर्गिक हाणी होताना दिसत आहे. आग इतकी भीषण आहे की, या आगीमुळे परिसरात राहणाऱ्या लोकांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.

ही आग आटोक्यात आणण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. शिवाय स्थानिक लोकंही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला मदत करत आहेत. वनविभाग क्षेत्राच्या आणि रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूने आग लागल्याने आग विझवण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत.

दरम्यानची रेल्वे वाहतूक बंद 

खर्डी ते कसारा रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूने कित्येक किलोमीटर आग पसरली आहे. ही आग रात्रीच्या वेळी लागल्याने आगीच्या ज्वाळा अगदी लांबूनही स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे आता कसाऱ्याहून मुबंईच्या दिशेने आणि खर्डीहून कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना स्थगिती देण्यात आली आहे. परिणामी कसारा, खर्डी मार्गे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या असंख्य प्रवाशांना अडकून पडावं लागलं आहे.

ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पण अद्याप आग आटोक्यात आलेली नाही. तसेच रात्रीच्या वेळी आग लागल्याने घटनास्थळी संपर्क साधणेही कठीण झालं आहे.

Published by: News18 Desk
First published: March 3, 2021, 11:48 PM IST

ताज्या बातम्या