सुपरमार्केटमध्ये चोरी करण्यासाठी गेला कुत्रा, सामान घेतलं आणि ठोकली धूम; पाहा VIDEO

सुपरमार्केटमध्ये चोरी करण्यासाठी गेला कुत्रा, सामान घेतलं आणि ठोकली धूम; पाहा VIDEO

खरंतर या व्हिडिओवर काही लोकांनी आनंद व्यक्त केला आहे तर काहींनी सुपरमार्केटच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

  • Share this:

ब्राझील, 21 ऑक्टोबर : ब्राझीलच्या एका सुपरमार्केमध्ये असा एक प्रकार समोर आला की तो पाहिल्यानंतर सगळेच हैराण झाले. इथे एका कुत्र्याने मोठ्या हुशारीने सुपरमार्केमध्ये चोरी केली आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. खरंतर या व्हिडिओवर काही लोकांनी आनंद व्यक्त केला आहे तर काहींनी सुपरमार्केटच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

ही घटना स्टोअरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कुत्रा सुपरमार्केटमध्ये प्रवेश करतो आणि तोंडात पॅकेट उचलून पळून जातो. हा व्हिडिओ यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी कुकीज ठेवण्यात आल्या आहेत त्या ठिकाणी कुत्रा जातो आणि तोंडात पाकिटं उचलून बाहेर पळून जातो. जवळपास उभे असलेले लोक त्याला पाहतच राहतात.

स्टोअरचा मालक पाउलो कार्डोसो डेली मेलशी बोलताना म्हणाले की, कुत्रा पॅकेट उचलल्यानंतर सुपरमार्केटमधून पळाला. पण त्याने पॅकेट स्टोअरच्या बाहेर सोडलं आणि निघून गेला.

काही वेळाने कुत्रा परत आला, तेव्हा स्टोअरच्या कर्मचार्‍यांनी त्याला कुकीज दिली. ते म्हणाले, या कुत्र्याने असं काही करणं ग्राहकांना आवडलं आहे. आणि स्टोअरच्या मालकालाही कुत्र्याचा हा प्रकार आवडला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

First published: October 21, 2019, 3:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading