News18 Lokmat

IPL 2019 : असा आहे ड्वेन ब्राव्होचा फिटनेस फंडा, पाहा VIDEO

जखमी ब्राव्हो सध्या विश्रांती करत असून, दोन आठवडे तरी तो चेन्नईसाठी खेळू शकणार नाही.

News18 Lokmat | Updated On: Apr 8, 2019 02:22 PM IST

IPL 2019 : असा आहे ड्वेन ब्राव्होचा फिटनेस फंडा, पाहा VIDEO

चेन्नई, 08 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्ज संघानं पाच पैकी चार सामने जिंकत आपला विजयरथ कायम राखला आहे. धोनीची सेना हळुहळु आपलं चौथं विजेतपद जिंकण्यासाठी आगेकुच करत आहेत. मुंबई इंडियन्ससोबत वानखेडेवर एकमेव पराभव चेन्नईला स्वीकारावा लागला. मात्र, पंजाबला मात देत धोनीच्या संघानं आपल्या घरच्या पुन्हा कमबॅक केला.

चेन्नईचा संघाची विजयी घौडदौड सुरु असली तरी, धोनीला मुंबई सोबतच्या सामन्यानंतर मोठा झटका बसला. चेन्नई संघाचा ऑलराऊंडर ड्वेन ब्राव्हो या जखमी झाला, त्यामुळं दोन आठवडे तरी, ब्राव्हो खेळु शकणार नाही आहे. त्यामुळं सध्या ब्राव्हो आपल्या फिटनेसकडं विशेष लक्ष देत आहे. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी ब्राव्होनं कोणत पेयक (ड्रींक) त्याचं आवडत आहे, हे सांगितलं.
Loading...

 

View this post on Instagram
 

Hakka for the #yellove makka and Champion introduces his favourite drink! #WhistlePodu


A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl) on

आपल्या आरोग्याची नेहमीच काळजी घेणारा ब्राव्हो सध्या दुखापतीतून सावरण्यासाठी याच पेयाचे सेवन करत आहे. हे पेयक आहे केळ, दही आणि मध यांचं मिश्रण. ब्राव्हो च्या डायटमध्ये रोज हे पेयक असतं. एवढंच नाही तर ब्राव्हो हे पेयक स्वत: तयार करतो. ब्राव्होनं या पेयाला चॅम्पियन ड्रींक असं नाव दिले आहे.

ब्राव्हो दोन आठवडे विश्रांती करुनच पुढील सामने चेन्नईकरिता खेळणार आहे. ब्राव्होनं आतापर्यंत 4 सामन्यात 7 विकेट घेतले आहेत.


बिर्याणीवरून आधी वाद..नंतर हाणामारी, काँग्रेस कार्यकर्त्यांचा VIDEO समोरबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 8, 2019 02:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...