आईचा आक्रोश ऐकून मृत घोषित केलेल्या मुलाच्या डोळ्यातून झरले अश्रू

कोणत्याही चित्रपटात शोभेल अशी ही घटना आहे हैदराबादमधली. तेलंगणाच्या सूर्यापेटमध्ये एका 18 वर्षांच्या मुलाला मृत घोषित करण्यात आलं. त्याच्या अंत्यसंस्काराची तयारीही सुरू झाली होती. चिता पेटवण्यासाठी लाकडंही आणली होती. पण एवढ्यात एक चमत्कार घडला...

News18 Lokmat | Updated On: Jul 10, 2019 04:20 PM IST

आईचा आक्रोश ऐकून मृत घोषित केलेल्या मुलाच्या डोळ्यातून झरले अश्रू

हैदराबाद, 10 जुलै : कोणत्याही चित्रपटात शोभेल अशी ही घटना आहे हैदराबादमधली. तेलंगणाच्या सूर्यापेटमध्ये एका 18 वर्षांच्या मुलाला मृत घोषित करण्यात आलं. त्याच्या अंत्यसंस्काराची तयारीही सुरू झाली होती. चिता पेटवण्यासाठी लाकडंही आणली होती. पण एवढ्यात एक चमत्कार घडला..

गंधम करिन या तरुणाला अचानक ताप आला, उलट्या सुरू झाल्या. त्यामुळे त्याला 26 जूनला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. जिल्हा रुग्णालयात औषधोपचार होऊ शकले नाहीत म्हणून त्याला हैदराबादला नेलं.

हैदराबादमधल्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये गंधमला दाखल केलं. तिथे मात्र डॉक्टरांनी त्याची तब्येत गंभीर असल्याचं सांगितलं. गंधम कोमात गेला होता. त्यानंतर पाच दिवस त्याच्यावर उपचार झाले पण प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली होती.

ब्रेन डेड घोषित

गंधम ब्रेन डेड झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. एखादा रुग्ण जेव्हा ब्रेन डेड होतो तेव्हा तो पुन्हा जिवंत होईल की नाही हे सांगता येत नाही. गंधम ब्रेन डेड आहे म्हणजे त्याचा मृत्यूच झाला आहे, असा त्याच्या घरच्यांनी समज करून घेतला आणि त्याच्या अंत्यसंस्कारांची तयारी केली.

Loading...

फोनमध्ये इंटरनेट नाही? तरीही ट्रान्सफर करू शकता 'असे' पैसे

गंधमला चितेवर चढवण्याआधी जमिनीवर झोपवलं. त्याच वेळेस त्याची आई त्याच्याजवळ बसून आक्रोश करत होती. हे ऐकून त्याच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. हे पाहून नातेवाईकांनी पुन्हा डॉक्टरना बोलवलं. गंधम जिवंत आहे, असं डॉक्टरांनीही सांगितलं.

संवाद सुरू झाला

यानंतर पुन्हा गंधमवर उपचार करण्यात आले. हळूहळू त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. आता तर गंधम कुटुंबीयांशी संवादही साधू लागला आहे, कधीकाळी याच गंधमला मृत घोषित करण्यात आलं होतं यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही एवढी त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे.

आईची आर्त हाक ऐकून गंधमच्या शरीरात प्राण फुंकले गेले. या क्षणाने सगळ्यांनाच पूर्णपणे हेलावून सोडलं होतं.

=============================================================================================

SPECIAL REPORT: काय आहे सलमान-कतरिनाच्या लग्नाचं सत्य?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2019 04:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...