पोर्न साईट पाहणाऱ्यांनो सावधान! खंडणीसाठी तुम्हालाही येऊ शकतो फोन

इंटरनेटवर ऑनलाईन विविध साईट तुम्ही पाहात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण तुम्हाला खंडणीसाठी फोन येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2018 09:35 AM IST

पोर्न साईट पाहणाऱ्यांनो सावधान! खंडणीसाठी तुम्हालाही येऊ शकतो फोन

अक्षय कुडकेलवार, प्रतिनिधी

मुंबई, 11 ऑक्टोबर : इंटरनेटवर ऑनलाईन विविध साईट तुम्ही पाहात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण तुम्हाला खंडणीसाठी फोन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. फेसबुक, युट्यूब, डेटिंगसाईट्स, मॅट्रीमोनी अशा विविध साईट्सवर तुम्ही सर्फिंग करत असाल तर आताच सावाध व्हा...कारण तुमच्यावर कोणीतरी नजर ठेवून आहे.

तुम्ही जर इंटरनेटवर पोर्नोग्राफी पाहात असाल तर ते तुम्हाला अलगद जाळ्यात ओढतात आणि तुम्हाला ब्लॅकमेल करून तुमच्याकडून खंडणी वसूल करतात. खंडणीसाठी तुम्हाला धमक्याही येऊ शकतात.

या खंडणीखोरांची गुन्हा करण्याची पद्धत अनोखी आहे. ते सोशल मीडियावरून तुमची माहिती चोरीछुपे मिळवतात  आणि सुरू होतो खंडणी वसूलीचा खेळ. जगाच्या तुलनेत भारतात अशा गुन्हांची संख्या अधिक आहे.

मायक्रोसॉफ्टचा अहवालानुसार...

Loading...

- जगभरातील एकूण गुन्ह्यांपैकी 77% गुन्हे भारतात घडतात

- 64 % गुन्ह्यात पुरुषांची लूट

- 61% महिलांनी अशा प्रकरणात तक्रार दाखल केली

आज इंटरनेट केवळ माहिती मिळवण्याचं साधन राहिलं नाही, तर सोशल मीडियासोबतचं मनोरंजनाचं साधन बनलं आहे. त्यामुळंचं इंटरनेटवरील पोर्नोग्राफीच्या  आहारी गेलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

त्यामुळे पोर्न साईटच्या नावाखाली कुणी धमकावण्याचा अथावा खंडणी मागण्याचा प्रयत्न केल्यास तुम्ही पोलिसांच्या सायबर सेलकडं तक्रार करू शकता. तेव्हा असा फोन तुम्हाला आल्यास तात्काळ सायबर सेलची मदत घ्या आणि ऑनलाईन काहीही करताना जरा काळजीच घ्या.

दोन महिन्यांवर होतं लग्न पण धावती लोकल पकडताना गेला जीव, धक्कादायक VIDEO

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2018 09:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...