Home /News /news /

प्रियकराने डेटिंगसाठी खर्च केले 50000 रुपये; आता वाद गेलाय थेट उच्च न्यायालयात

प्रियकराने डेटिंगसाठी खर्च केले 50000 रुपये; आता वाद गेलाय थेट उच्च न्यायालयात

ब्रेकअपनंतरचा असा प्रकार तुम्ही कधीच पाहिला नसेल.

    सुरत, 17 ऑक्टोबर : गुजरातच्या मेहसाणामध्ये विचित्र प्रकार घडला आहे. या तरुणाने प्रेमसंबंधात असताना वारेमाप खर्च केला. अगदी प्रेयसीला कॉफी शॉपमध्ये घेऊन जाणं, महागडे गिफ्ट्स देणं. मात्र ब्रेकअपनंतर चित्र इतकं पालटलं की तुमचा विश्वास बसणार नाही. या पठ्ठ्याने ब्रेकअपनंतर प्रेयसीसाठी खर्च केलेले 50000 रुपये परत दे असा तगादा सुरू केला. मात्र जेव्हा प्रेयसीने त्याला पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तो शिवीगाळ करू लागला. यावर त्रासलेल्या प्रेयसीने त्याच्याविरोधात जबरदस्ती वसुली करण्याचा गुन्हा दाखल केला असून हे प्रकरण आता उच्च न्यायालयात गेलं आहे. हे ही वाचा-VIDEO : रिपोर्टरने विचारलं, गावात 'विकास' पोहोचला? आजोबांनी दिलं मजेशीर उत्तर या प्रकरणात 27 वर्षांच्या तरुणाचे 21 वर्षांच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. सोशल मीडियावर त्यांची ओळख झाली होती. दोघेही मेहसानाच्या एकाच गावात राहणारे आहेत. त्यांच्या प्रेमाची सुरुवात 2018 एप्रिलला झाली. तर या वर्षी 2020 फेब्रुवारीमध्ये त्यांच्यातील प्रेमसंबंध संपुष्टात आले. त्याचं झालं असं एका कार्यक्रमात तरुणाने प्रेयसीला सोबत येण्याचा आग्रह केला होता. मात्र परीक्षा असल्याने तिला जमलं नाही. याच्या रागात प्रियकराने तिच्यासोबत वाद करीत प्रेमसंबंध संपवले. यानंतर प्रेयसीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने केलेल्या तक्रारीनुसार प्रियकर ब्रेकअप झाल्यानंतर तिच्याकडे 50000 रुपये परत करण्याची मागणी करीत आहे. तरुणाने हे पैसे प्रेयसीला फिरविण्यासाठी, डेटवर, जेवण-नाश्त्यासाठी खर्च केले. प्रेयसीने ती विद्यार्थी असल्याने इतके पैसे नसल्याचे सांगितले. मात्र प्रियकर तिला शिवीगाळ करीत पैशांची मागणी करीत होता. त्याने फोनवरुन तिला धमकी देण्यास सुरुवात केली. जर पैसे दिले नाहीस तर तुझे अश्लील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याची धमकी दिली. प्रेयसीने फोन बंद ठेवला. यानंतर मात्र त्याने 60000 रुपयांची मागणी केली. यानंतर त्रस्त झालेल्या प्रेयसीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Breakup, Love story

    पुढील बातम्या