बॉयफ्रेंडसोबत पळून गेलेल्या अल्पवयीन तरुणीवर मित्रांनी केला बलात्कार, नवी मुंबईत धक्कादायक प्रकार

बॉयफ्रेंडसोबत पळून गेलेल्या अल्पवयीन तरुणीवर मित्रांनी केला बलात्कार, नवी मुंबईत धक्कादायक प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, बॉयफ्रेंडच्याच मित्रांनी तरुणीवर बलात्कार केल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 19 ऑगस्ट : बॉयफ्रेंडसोबत पळून गेलेल्या 17 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बॉयफ्रेंडच्याच मित्रांनी तरुणीवर बलात्कार केल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेचा तपास केला असता पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समोर येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन तरुणी ही तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली होती. खारघरमधील एका फ्लॅटमध्ये नेलं. पीडितेला फ्लॅटवर नेल्यानंतर तिला पावडर आणि ड्रग्ज देण्यात आले आणि नंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार; तिची हत्या करुन पतीने स्वत:लाही संपवलं

15 ऑगस्ट दिवशी ही घटना घडली असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिला आधी खारघरला एका फ्लॅटमध्ये नेण्यात आलं त्यानंतर तिच्यावर बॉयफ्रेंडच्या तीन मित्रांनी बलात्कार केला पण यावेळी प्रियकराने कोणालाही अडवलं नाही अशी माहिती तिने दिली.

नवी मुंबईकरांच्या जीवाला धोका, डॉक्टरांनी वापरलेले हातमोजे धुवून पुन्हा वापरात

या सगळ्या प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 19, 2020, 10:46 PM IST

ताज्या बातम्या