'मी चांगला मुलगा होऊ शकलो नाही', 'ती'च्यासाठी युवकाने घेतला गळफास

तपासादरम्यान तरुणींच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी सम्यक याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

News18 Lokmat | Updated On: May 14, 2019 07:21 PM IST

'मी चांगला मुलगा होऊ शकलो नाही', 'ती'च्यासाठी युवकाने घेतला गळफास

हर्षल महाजन, प्रतिनिधी

नागपूर, 14 मे : प्रेयसीच्या विरहात प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना नागपूर  यशोधरानगरमधील पाटीलनगर इथं उघडकीस आली आहे. सम्यक खुशाल मेश्राम (वय १९) असं मृताचं नाव आहे. तो उबेरमध्ये डिलिव्हरी बॉय होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सम्यक याचे धंतोली भागात राहणाऱ्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाबाबत तरुणींच्या नातेवाईकांना माहिती मिळाली. त्यांनी तरुणीला समजवलं. नातेवाईकांना प्रेमसंबंधाबाबत माहिती मिळाल्याने काही महिन्यांपूर्वीच तरुणीने आत्महत्या केली. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.

तपासादरम्यान तरुणींच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी सम्यक याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. प्रेयसीने आत्महत्या केल्याने सम्यक हा तणावात होता. त्यातुनच त्याने शनिवारी लोखंडी पाईपला ओढणी बांधून गळफास घेतला.

हेही वाचा : युवकाचा मृत्यू; व्हिडिओ कॉलवर गर्लफ्रेंडला सांगत होता फाशी कशी घ्यायची!

Loading...

दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. सम्यकने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. सम्यकच्या आत्महत्येप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

मी चांगला मुलगा होऊ शकलो नाही...

'तरुणीवर माझं खूप प्रेम होतं. ती गेली. तिच्याशिवाय मी जगू शकत नाही. मम्मी-पप्पा मला माफ करा, मी चांगला मुलगा होऊ शकलो नाही. सॉरी, सॉरी, सॉरी' असं सम्यकने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप रायनवार यांनी दिली आहे.

खरंतर प्रेमामध्ये तरुणी आणि मुलगा दोघांचा जीव गेला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या तरुण मुलांना अशा पद्धतीने गमावल्यामुळे दोन्ही कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तर परिसरात या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.


शेतकऱ्याची लेक चालली सासरला तेही थेट हेलिकॉप्टरने, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 14, 2019 07:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...