मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

हात जोडून उकळत्या पाण्याच्या कढईत ध्यानावस्थेत बसला चिमुकला; भयानक घटनेचा VIDEO

हात जोडून उकळत्या पाण्याच्या कढईत ध्यानावस्थेत बसला चिमुकला; भयानक घटनेचा VIDEO

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक अतिशय धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगा उकळत्या पाण्याच्या कढईत (boy sat in Cauldron of boiling water) बसला आहे.

नवी दिल्ली, 08 सप्टेंबर: सोशल मीडियावर सध्या एक अतिशय धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये एक मुलगा उकळत्या पाण्याच्या कढईत (boy sat in Cauldron of boiling water) बसला आहे. हा भयंकर व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. संबंधित प्रकरण नेमंक काय आहे? याचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता घटनेबाबत पुरेशी माहिती मिळू शकली नाही. पण सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं असून काही जणांनी हा व्हिडीओ बनावट असल्याचं म्हटलं आहे.

खरंतर, हा व्हिडीओ एका ट्विटर वापरकर्त्यानं आपल्या अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना युजरनं लिहिलं की 'हा 2021 चा भारत आहे'. या व्हिडीओत दिसत आहे की, एक मुलगा भल्या मोठ्या कढईतील उकळत्या पाण्यात समाधी घेतलेल्या अवस्थेत बसला आहे. तर काहीजण या चुलीत लाकूड टाकून मोठी आग लावत आहे. दरम्यान याठिकाणी आजूबाजूलाही लोकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली आहे.

हेही वाचा- शिकार करायला आला अन् विहिरीत पडला; मांजरीने बिबट्याला दिली कडवी झुंज, पहा VIDEO

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही जणांनी मुलाचं कौतुक केलं आहे, तर काहीजण व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. संबंधित मुलगा उकळत्या पाण्यात हात जोडून आरामात बसत काही मंत्राचा जप करत आहे. विशेष म्हणजे चुलीत मोठा जाळ लावला असूनही मुलाला काहीही होतं नाहीये.

हेही वाचा-थरकाप! झोपलेल्या तरुणाच्या पांघरुणात शिरला कोब्रा, जाग आल्यावर केला हल्ला

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित व्हिडीओ 2019 मध्ये देखील व्हायरल झाला होता. त्यानंतर आता हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. त्या वेळी कोणीतरी हा व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड केल्याचंही संबंधित वृत्तात म्हटलं आहे. काही लोकांच्या मते वैज्ञानिक कारणांमुळे गरम पाण्याचे चटके मुलाला बसत नसल्याचा दावा काही जणांनी केला आहे. संबंधित व्हिडीओ खरा आहे की खोटा? किंवा मुलाला उकळत्या पाण्याचे चटके का बसत नाहीयेत, याबाबत न्युज18 कसलाही दावा करत नाही.

First published: