मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मुंबईकर क्रिकेटपटूनं पाहिलं IPL खेळण्याचं स्वप्न, संधी न मिळाल्याने लावली जीवाची बाजी

मुंबईकर क्रिकेटपटूनं पाहिलं IPL खेळण्याचं स्वप्न, संधी न मिळाल्याने लावली जीवाची बाजी

करिअरच्या विचाराने 27 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल....

करिअरच्या विचाराने 27 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल....

करिअरच्या विचाराने 27 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल....

मुंबई, 12 ऑगस्ट : मुंबईत मालाड पूर्वेत 27 वर्षाच्या करण तिवारी क्रिकेट खेळणारा तरुणांनी सोमवारी रात्री आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आली आहे. करिअरमध्ये आयपीएल किंवा मोठ्या मॅचमध्ये खेळायची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. करण तिवारीनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करिअरमध्ये मोठी संधी न मिळाल्यामुळे करणने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं आहे. करणने आत्महत्येपूर्वी शेवटचा कॉल राजस्थानमध्ये असलेल्या त्याच्या मित्राला केला होता असंही पोलीस तपासात समोर आलं आहे. करणच्या राजस्थानमधील मित्राची चौकशी केली असता धक्कादायक सत्य समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं. महाराष्ट्रात ऑपरेशन कमळची तारीख भोंदू डॉक्टराने दिली, सेनेनं उडवली खिल्ली मिळालेल्या माहितीनुसार, करणने मित्राला कॉल करून मी मानसिक तणावामध्ये आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे असं सांगितलं. यावर मित्राने लगेच त्याच्या बहिणीला फोन केला आणि याबद्दल माहिती दिली. यानंतर बहिणीने मुंबईला तिच्या आईला फोनवर घडलेला प्रकार सांगितला. आक्षेपार्ह पोस्टमुळे भडकला हिंसाचार, गोळीबारात 2 ठार तर 60 पोलीस जखमी आईने घाईत घर उघडलं तर त्यावेळी करणने आत्महत्या केल्याचं समोर आलं. खोलीमध्ये त्याचा मृतदेह पडून होता. गळफास घेतल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी करणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नजिकच्या रुग्णालयात पाठवला आहे. तर पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
First published:

पुढील बातम्या