आंधळं प्रेम! 2 वेळा गर्भपात करायला लावणाऱ्या प्रियकरावर ठेवला विश्वास आणि...!

सध्या प्रेमाची व्याख्या फक्त शरीर सुखासाठी राहिली आहे असं म्हणायला हरकत नाही. याचं जिवंत उदाहरण भिवंडीत समोर आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 3, 2019 03:49 PM IST

आंधळं प्रेम! 2 वेळा गर्भपात करायला लावणाऱ्या प्रियकरावर ठेवला विश्वास आणि...!

रवी शिंदे, प्रतिनिधी

भिवंडी, 03 एप्रिल : भिवंडी शहरातील गायत्रीनगर इथे प्रेमाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. घराशेजारी राहत असलेल्या तरुणीशी प्रेमसंबंध तयार करून तिला लग्नाचं अमिश दाखवून एका भामट्याने तिच्यावर अत्याचार केले आणि पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सध्या प्रेमाची व्याख्या फक्त शरीर सुखासाठी राहिली आहे असं म्हणायला हरकत नाही. याचं जिवंत उदाहरण भिवंडीत समोर आलं आहे. घराशेजारी राहणाऱ्या तरुणाने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. आपण लग्न करू असं म्हणत तरुणाची पीडितेशी प्रेमसंबंध वाढवले.

त्यानंतर या दोघांमध्ये शरीरसंबंध सुरू झाले. वेळोवेळी शरीर संबंध ठेवल्याने सदर पीडित दोन वेळा गरोदर राहिली. मात्र भामट्या तरुणाने त्याच्या आईच्या मदतीने तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला. या सगळ्यानंतर पीडितेने लग्नासाठी हट्ट धरला. पण तरुणाने तिला लग्नासाठी नकार दिला.

लग्नास नकार देऊन भामटा तरुण आईला घेऊन आपल्या मूळ उत्तर प्रदेश येथील गावी पळून गेला. त्यामुळे फसवणूक झाल्याचं तरुणीच्या लक्षात आल्यानं तिने भामटा फैजल अंसारी (२२) आणि त्याची आई रुबीना अंसारी (४०) या दोघांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Loading...

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाविरोधात पोलीस आता कसून तपास करत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच्याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी पीडित तरुणीची चौकशी करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. तर या प्रकरणी पोलीस शेजाऱ्यांचीही चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

खरंतर, हल्लीच्या जगात आपण कोणावरी किती विश्वास ठेवावा हे ठरवता आलं पाहिजे. शरीरसंबंधातून गुन्हे होण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे तुम्ही अशा कोणत्याही प्रकारात अडकत नाही ना, याची नक्की खात्री करा.

VIDEO : रावसाहेब दानवे पुन्हा चुकले! विंग कमांडर अभिनंदनबद्दल केलं 'हे' वक्तव्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: love
First Published: Apr 3, 2019 03:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...