लग्नाच्या 18व्या दिवशीच पठ्ठ्याने केला दुसरा विवाह, प्रेयसीने असा केला पर्दाफाश

लग्नाच्या 18व्या दिवशीच पठ्ठ्याने केला दुसरा विवाह, प्रेयसीने असा केला पर्दाफाश

इथे एक विवाह केला तर तो संसार झेलता येत नाही असा अनेक विवाहितांचा अनुभव तुम्ही ऐकला असेल. पण या पठ्ठ्याने 18 दिवसात 2 विवाह केले. पण त्याचं पितळं असं काही उघडं पडलं की सगळ्यांनाच त्याचा धक्का बसला.

  • Share this:

भोपाळ, 18 मार्च : एखाद्या वक्तीचे 2 विवाह झाले असल्याचं तुम्ही पाहिलं आहे किंवा एखाद्या व्यक्तीने लपून-छपून 2 विवाह केल्याचंही तुम्ही पाहिलं असेल. पण याचाच एक धक्कादायक प्रकार भोपाळमध्ये समोर आला आहे. भोपाळच्या हबीबगंजमध्ये एका युवकाने 2 विवाह केले तेही अवघ्या 18 दिवसांत.

हो, इथे एक विवाह केला तर तो संसार झेलता येत नाही असा अनेक विवाहितांचा अनुभव तुम्ही ऐकला असेल. पण या पठ्ठ्याने 18 दिवसात 2 विवाह केले. पण त्याचं पितळं असं काही उघडं पडलं की सगळ्यांनाच त्याचा धक्का बसला.

भोपाळचा मयंक जेन हा सराफ व्यापारी आहे. 1 जानेवारी 2019 ला त्याचा विवाह झाला. हा विवाह त्याच्या घरच्यांच्या इच्छेनुसार झाला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. मयंकचं एका तरुणीशी प्रेम प्रकरण होतं. त्याला तिच्याशी विवाह करायचा होता. पण कदाचित घरच्यांनी त्याच्या विवाहाला नकार दिला. त्यामुळे मयंकने त्याच्या घरच्यांच्या सांगण्यानुसार 1 जानेवारीला विवाह केला.

सगळ्यात विशेष म्हणजे मयंकचा विवाह झाला आहे. याची त्याच्या प्रेयसीला भनकही नव्हती. त्यानंतर मयंकने 18 जानेवारीला त्याच्या प्रेयसीसोबत विवाह केला. पण या विवाहाची भनक मयंकच्या पहिल्या पत्नीलाही नव्हती.

दरम्यान, काही दिवस उलटल्यानंतर मयंकच्या प्रेयसीला त्याच्यावर संशय आला आणि तिने संपूर्ण प्रकरणाचा शोध लावला. तेव्हा मयंकचं आधीच लग्न झालं असल्याचं धक्कादायक सत्य तिच्या समोर. त्यानंतर कोणताही विचार न करता मयंकची पोलीसात तक्रार दाखल केली.

हबीबगंज पोलिसांनी मयंक विरोधात तक्रार दाखल केली आणि प्रकरणाचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांनी मयंकला ताब्यात घेतलं आहे. तर याचा आता पोलीस अधिक तपास करत आहेत.

गर्ल्स कॉलेजमध्ये शिक्षकाने दिला सेक्स क्लास, VIDEO व्हायरल

First published: March 18, 2019, 5:00 PM IST
Tags: marriage

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading