Asian Games 2018: अमित पंघलचा 'गोल्डन' पंच, भारताच्या खात्यात 14वे सुवर्णपदक

Asian Games 2018: अमित पंघलचा 'गोल्डन' पंच, भारताच्या खात्यात 14वे सुवर्णपदक

  • Share this:

01 सप्टेंबर  : आशियाई क्रीडा स्पर्धेत अमित पंघलने बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. त्याच्या या सुवर्णकामगिरीमुळे भारताच्या खात्यात १४वे सुवर्णपदक जमा झाले आहे. अमितने उज्बेकिस्तानच्या

ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता हसनबॉय दुसामाटोवला 3-2 अशी मात देऊन त्याने हा किताब आपल्या नावावर केला आहे. त्याच्या या गोल्डन पंचमुळे बॉक्सिंग चाहत्यांमध्ये मोठा जल्लोष पहायला मिळतोय. त्याचबरोबर सोशल मीडियातूनही अमितवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत  १३व्या दिवशी रौप्य आणि कांस्य पदकवर समाधान मानावे लागले होते. पण आज (शुक्रवार) १४व्या दिवशी अमित पंघलने बॉक्सिगमध्ये पुरूषांच्या ४९ किलो वजानगटात सुवर्णपदक मिळवले आहे. अमितच्या या कामगिरीमुळे भारताकडे एकून ६६ पदकांचा समावेश आहे.

महिला हॉकी संघाला अंतिम फेरी रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याचबरोबर बॉक्सिगमध्ये पुरूषांच्या ४९ किलो वजानगटातील भारतीय स्पर्धक विकास कृष्णला लागल्याने तो अंतिम सामना खेळू शकला नाही त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

First published: September 1, 2018, 1:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading