Home /News /news /

मुंबईकर आणि पुणेकरांसाठी No Entry, मोठे दगड टाकून रस्ते बंद

मुंबईकर आणि पुणेकरांसाठी No Entry, मोठे दगड टाकून रस्ते बंद

मुंबईकर आणि पुणेकरांसाठी अनेक जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.

    कोल्हापूर, 24 मार्च : देशामध्ये कोरोनाव्हायरसचं संकट फैलावलं असल्यामुळे अनेक राज्यामध्ये संचारबंदीसारखे कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण देशामध्ये संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमिवर सगळ्या जिल्ह्यांच्या सीमादेखील सील करण्यात आल्या आहे. कोल्हापूरमध्ये तर नागरिकांनी रस्त्यावर मोठे दगड टाकून रस्ता बंद केला आहे. मुंबईकर आणि पुणेकरांसाठी अनेक जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. सगळे लोक सुट्ट्या लागल्या म्हणून गावी जाण्यासाठी निघाले आहेत अशात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील इंचनाळ गाव पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. गावात येणारे तीन रस्ते बंद केले आहेत. मोठे दगड टाकून रस्ते बंद करण्यात आले आहेत. बाहेरील व्यक्तीला गावात प्रवेश नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांची खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर कोल्हापूरमधील शिराळा आणि शाहूवाडी तालुक्याला जोडणारा पुलही बंद करण्यात आला आहे. महाराष्ट्रात चिंता वाढली, कोरोना रुग्णांची संख्या 101 वर भारतामध्ये एकीकडे 37 कोरोनाचे रुग्ण बरे होऊन आज घरी जाणार आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे. कालपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 97 होती पण आता कोरोनाचे आणखी 4 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. पुण्यात 3 तर साताऱ्यामध्ये कोरोनाचा 1 असे चार नवे रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 101 झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधणार वैश्विक महामारी कोरोनाव्हायरसचा फैलाव हा वेगाने वाढत आहे. त्यावर अतिशय महत्त्वाची माहिती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत. 24 मार्चला रात्री 8 वाजता मोदी हे देशाशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते कोरोनाविषयी महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. आधीही पंतप्रधानांनी देशाशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आणि त्याला देशातील जनतेनं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मोदी हे जनतेला महत्त्वाच्या सूचना देणार असून काही कठोर निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या