बॉस म्हणाला- माझ्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेव, मग म्हणाला - नातं संपव, कर्मचाऱ्याची आत्महत्या

बॉस म्हणाला- माझ्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेव, मग म्हणाला - नातं संपव, कर्मचाऱ्याची आत्महत्या

एका बॉसने कर्मचाऱ्याला स्वत:च्या पत्नीवर प्रेम करण्यासाठी दबाव टाकल्या. बॉसच्या दबावामुळे ते दोघे एकमेकांवर प्रेम करू लागले.

  • Share this:

अहमदाबाद, 20 डिसेंबर : प्रेम आणि प्रेमातून गुन्ह्याच्या एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका बॉसने कर्मचाऱ्याला स्वत:च्या पत्नीवर प्रेम करण्यासाठी दबाव टाकल्या. बॉसच्या दबावामुळे ते दोघे एकमेकांवर प्रेम करू लागले. त्यांच्यात घट्ट नातं झालं पण त्यानंतर बॉसने पुन्हा नातं तोडण्यासाठी कर्मचाऱ्यावर दबाव टाकला. पण कर्मचाऱ्याने नातं तोडण्याची गोष्ट केल्यावर प्रेमात पडलेली पत्नी मात्र चिडली आणि तिने कर्मचाऱ्याला त्रास देण्यास सुरुवात केली.

एकीकडे बॉसचा दबाव आणि दुसरीकडे प्रेमात पडलेल्या बॉसच्या पत्नीच्या दबावामुळे कर्मचारी निखिल वैतागला आणि त्याने आत्महत्या केली. आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी कंपनी मालक आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. FIR नुसार, मयत 19 वर्षीय निखिल अविवाहित आहे आणि तो गोमतीपूर इथे राहणार आहे. ऑक्टोबर 2018मध्ये त्याने कंपनीमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली आहे.

14 जुलैला पगार घेण्यासाठी बोलावलं

नोकरीच्या तब्बल 10 महिन्यानंतर निखिलने त्याचे वडिल अशोर परमार यांना सांगितले की बॉस आणि त्याची पत्नी त्रास देत आहेत आणि त्यामुळे तो नोकरी सोडू इच्छित आहे. वडिलांनी निखिलला नोकरी सोडण्याची परवाणगीही दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जुलै 2019 ला निखिलच्या बॉसने त्याला पगार घेण्यासाठी बोलावले होते. पण 15 जुलैला तो बॉसला भेटण्यासाठी गेला. त्यानंतर निखिलने वडिलांना सांगितले की त्याचा बॉस त्याला राजस्थान ट्रिपला फिरण्यासाठी घेऊन जाणार आहे.

20 जुलैला बॉसने दिली आत्महत्येची माहिती

20 जुलैला निखिलच्या बॉसने त्याच्या वडिलांना फोन करून माहिती दिली की निखिलने कंपनीच्या गोदामात आत्महत्या केली आहे. अशोक जेव्हा कंपनीत गेले तेव्हा त्याचा मृतदेह ऑफिसमध्ये मिळाला. निखिलच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनी भाऊ संजय आणि निशाने त्याचा मोबाईल तपासला. तेव्हा हे सगळं प्रकरण त्यांच्या लक्षात आलं.

'मला गुलामासारखे वागवू नका'

या सगळ्यात एक अशी माहिती मिळाली की संपूर्ण कुटुंबाला धक्काच बसला. त्यात लिहिलं होतं की, 'तुम्ही तुमच्या बायकोला माझ्यावर प्रेम करायला सांगितले. मी ते केले. त्यानंतर तीसुद्धा माझ्या प्रेमात पडली. तुमच्या विनंतीनुसार आम्ही शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर तुम्ही मला तुमच्या पत्नीबरोबरचे संबंध संपवण्यास सांगितलं. तुम्ही मला पगार देणार नाहीत अशी धमकीही दिली होती. कृपया, माझ्याशी गुलामासारखे वागू नका. माझ्यावर दया करा'

बायकोला नातं संपवायचं नव्हतं

सुरुवातीच्या तपासात पोलिसांना माहिती मिळाली की, 45 वर्षीय कंपनी मालकाने सुरुवातीला निखिलवर त्याच्या 25 वर्षीय पत्नीवर प्रेम करण्यासाठी दबाव आणला. त्यानंतर त्याने त्याला संबंध संपवण्यास सांगितलं. पण ते पत्नी निखिलवर प्रेम करू लागली होती. तिला हे नातं संपवायचं नव्हतं.

Tags:
First Published: Dec 20, 2019 01:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading