Home /News /news /

अरे बापरे हे तर खूपच भयंकर! संतापलेल्या मॅनेजरनं कर्मचाऱ्याच्या बोटाचा तुकडाच पाडला

अरे बापरे हे तर खूपच भयंकर! संतापलेल्या मॅनेजरनं कर्मचाऱ्याच्या बोटाचा तुकडाच पाडला

पीडित तरूण एका प्रायव्हेट इंश्युरन्स कंपनीत नोकरी करतो.

    नवी दिल्ली, 12 सप्टेंबर: दिल्लीतील मंडावली भागात (Mandavali Locality) एका इंश्युरन्स कंपनीत (Insurance company)काम करणारे मॅनेजर आणि एका कर्मचाऱ्यामध्ये गुरुवारी बाचाबाची झाली होती. यावरून रागाच्या भरात मॅनेजरनं कर्मचाऱ्याच्या बोटाला कडकडून चावा घेतला. त्यात कर्मचाऱ्याचा बोटाचा तुकडाच पाडला. या घटनेनंतर कर्मचाऱ्याला गंभीर जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. हेही वाचा..पुन्हा भडकला कोरियाचा हुकूमशहा; मंत्रालयातील 5 अधिकाऱ्यांना घातल्या गोळ्या मॅनेजरनं दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे. तसेच जखमी कर्मचारी देखील दारू प्यायला होता. कारमध्ये कामावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. वाद विकोपाला गेल्यानंतर मॅनेजरनं कर्मचाऱ्याच्या बोटाला कडकडून चावा घेतला. त्यात कर्मचाऱ्याचं बोट तुटलं. मिळालेली माहिती अशी की, घटनेनंतर वेदनेनं तळमळणाऱ्या पीडित कर्मचाऱ्यानं पोलिसांना फोन करून झालेला सगळा प्रकार सांगितला. पोलिस आल्यानंतर जखमी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये हालवण्यात आलं. कर्मचाऱ्याच्या बोटावर तातडीनं सर्जरी करण्यात आली आहे. आता पोलिसांनी आरोपी हेमंत सिद्धार्थ याच्याविरुद्ध भादंवि कलम 326 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित कर्मचाऱ्याचं नाव मोहित असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे. स्थानिक पोलिसांनी सांगितलं की, मोहित कुमार (34) असं पीडित व्यक्तीचं नाव आहे. तो एका प्रायव्हेट इंश्युरन्स कंपनीत नोकरी करतो. तो आपल्या कुटूंबासोबत गाझियाबाद येथील राजनगर एक्सटेंशनमध्ये राहातो. मोहित यानं सांगितलं की, गेल्या काही दिवसांपूर्वी तो अक्षरधामहून मॅनेजर हेमंत सिद्धार्थ याच्या त्याच्या कारमध्ये करोल बाग येथे काही कामानिमित्त गेला होता. सायंकाळी काम संपल्यानंतर मॅनेजरला अक्षरधाम येथे कार थांबवून आपल्याला खाली उतरायचं असल्याचं सांगितलं. मात्र, त्यावर मॅनेजर म्हणाला, मयूर विहार फेस-1 स्थित गलेरिया मॉलजवळ काम आहे. मात्र, मी त्याला नकार दिला. हेही वाचा...रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ काँग्रेस रस्त्यावर; 'बंगालच्या लेकी'साठी मोर्चा मात्र, मोहित यानं नकार दिल्यानंतरही मॅनेजर त्याल जबरदस्तीनं कारमध्ये बसवून मयूर विहार फेस-1 येथे घेवून गेला. नंतर मॅनेजर हेमंत याने मोहितला शिवीगाळ केली. एवढंच नाही तर हेमंत याने मोहितच्या थोबाडीत मारली. मोहितने स्वत:चा बचाव करण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर हात ठेवले. मात्र, हेमंत यानं त्याचे हात पकडले आणि बोटाला कडकडून चावा घेतला. या दरम्यान मोहितच्या बोटाचं तुकडंच पडलं
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Delhi

    पुढील बातम्या