VIDEO : ग्रामीण भागातील मुलांसाठी शेतकऱ्याने उभारलं 'पुस्तक घर'!

VIDEO : ग्रामीण भागातील मुलांसाठी शेतकऱ्याने उभारलं 'पुस्तक घर'!

  • Share this:

आसिफ मुरसल, सांगली, 8 डिसेंबर - तुम्ही अनेक घरं पाहिली असतील, पण पुस्तकांचं घर कधी पाहिलंय का? सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातील साळशिंगे या गावात चक्क पुस्तकाचं घर तयार करण्यात आलं आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाचं महत्त्व कळावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून येथील कदम या शेतरी कुटुंबीयांनी खास शेतकऱ्यांच्या मुलांसाठी 'पुस्तकाचं घर' उभं केलंय.

ग्रामीण भागात राहणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांची मुलं ही शेतीच करतात. शिक्षणाचं महत्त्व माहीत नसल्यामुळे मुलांनाच्या शिक्षणाकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. या मुलांची वाचन संस्कृती वाढावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथील कदम या शेतकरी कुटुंबीयांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

ज्येष्ठ सामाजिक चळवळीचे प्रणेते डॉ. प्रकाश आमटे यांच्या विचारांनी प्रेरीत होवून येथील रेवनसिद्ध शहाजी कदम आणि त्यांच्या कुटुंबियांनी 'पुस्तक घर'सुरू केलं. समाजातला कोणताच घटक शिक्षणापासून वंचित राहता कामा नये असा निर्धार कदम यांनी केलाय. कदम यांच्या या सेवाभावी उपक्रमामुळे अनेक पुस्तके वाचनासाठी उपलब्ध झाल्याने या गावातील गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना त्याचा फायदा होणार आहे.

कदम यांच्या पुस्तकाच्या घरांमध्ये हजारो पुस्तकं आहेत. लहानांपासून थोरांपर्यंत पुस्तक वाचण्यासाठी या घरात येतात. पुस्तक घरात वाचन कक्ष असून, अनेकजण येथे बसून पुस्तकं वाचतात. तर ज्याला घरी पुस्तक घेऊन जायचं असेल ते हवं असलेलं पुस्तक आठ दिवसांसाठी घरी घेऊन जाऊ शकतात. कदम कुटुंबियांनी उदात्त हेतूने साकारलेल्या या संकल्पनेला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

खानापूर तालुक्यातल्या एका लहानशा गावात साकारण्यात आलेल हे पुस्तक सर्वांच्या कौतुकाचा भाग बनलं आहे. तर हा आगळा-वेगळा उपक्रम पाहण्यासाठी खानापूर तालुक्यातील लोकं याठिकाणी गर्दी करत आहेत.

 लेफ्ट हँड ड्राईव्ह बसची टेम्पोला भीषण धडक, 2 जण जागीच ठार

First published: December 8, 2018, 7:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading