Breaking: अॅंटॉप हिलमध्ये एका झोपडीत गावठी बॉम्बचा स्फोट, दोघांना अटक

मुंबईतल्या अॅंटॉप हिल परिसरात रविवारी एका झोपडीत स्फोट झाला. या झोपडीत गावठी बॉम्बच्या झालेल्या स्फोटात एक जण जखमी झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 9, 2018 09:25 AM IST

Breaking: अॅंटॉप हिलमध्ये एका झोपडीत गावठी बॉम्बचा स्फोट, दोघांना अटक

विवेक गुप्ता, प्रतिनिधी

मुंबई, 09 ऑक्टोबर : मुंबईतल्या अॅंटॉप हिल परिसरात रविवारी एका झोपडीत स्फोट झाला. या झोपडीत गावठी बॉम्बच्या झालेल्या स्फोटात एक जण जखमी झाला आहे.

पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास  मुंबई गुन्हे शाखा आणि एटीएस कडून करण्यात येतोय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले दोन जण बंगालचे रहिवासी असल्याचं सांगण्यात आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात मोठं भीतीचं वातावरण आह. तर मुंबई क्राईम ब्रांच आणि एटीएस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

या झोपडीत गावठी बॉम्ब आलाच कसा, अटक केलेल्या दोघांचा काय हेतू होता याचा आता पोलीस तापस करत आहे. तर संपूर्ण परिसरात खबरदारीचं आणि शांतता राखण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

Loading...

VIDEO: आणखी एक थक्क करणारा रेल्वे स्टंट आला समोर, स्टंट करणाऱ्या या माकडाला शोधाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2018 09:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...