तिहेरी तलाक गुन्हा ठरवणाऱ्या अध्यादेशाविरोधातली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली

तिहेरी तलाक गुन्हा ठरवणाऱ्या अध्यादेशाविरोधातली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली

तिहेरी तलाक गुन्हा ठरवण्या-या अध्यादेशाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 01 ऑक्टोबर : तिहेरी तलाक गुन्हा ठरवण्या-या अध्यादेशाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली आहे. सदर प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असल्यानं सुनावणी घेण्यास कोर्टानं नकार दिला आहे. बीएमसीतील माजी नगरसेवक मसूद अन्सारी यांच्यासह इतरांनी ही याचिका दाखल केली होती पण ती मुंबई हायकोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे.

तिहेरी तलाक गुन्हा ठरवण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. अध्यादेश बेकायदा आणि मनमानी पद्धतीनं काढण्यात आल्याचा याचिकेत आरोप करण्यात आला होता. मुंबईतील माजी नगरसेवक मसूर अन्सारी, सामाजिक संस्था रायझिंग व्हॉईस फाऊंडेशन आणि वकील देवेंद्र मिश्रा यांनी ही याचिका दाखल केली होती.

या अध्यादेशामुळे मुस्लिम पुरुषांच्या मुलभूत अधिकारांवर गदा आली असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. या अध्यादेशाद्वारे मुस्लिम पुरुषांना टार्गेट केलं असल्याचा आरोप करत तिहेरी तलाक देणं गुन्हा ठरवण्याच्या तरतुदीला स्थगिती देण्याची याचिकेत मागणी करण्यात आली होती.

या अध्यादेशानुसार तिहेरी तलाक दिल्यास पतीला ३ वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसंच पीडीत स्रीला आणि तिच्या अपत्याला आर्थिक मदत मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. अपत्य सज्ञान नसल्यास त्याचा ताबा मिळवण्यासाठी मॅजिस्ट्रेटकडे पीडीत महिला दाद मागू शकते. पण ही याचिकाच हायकोर्टाने फेटाळली आहे.

बापरे, मुंबईतल्या 'बीकेसी'त निघाला अकरा फुटाचा अजगर, पाहा हा VIDEO

 

First published: October 1, 2018, 2:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading